लोककलावंत सांस्कृतिक मंच मुंबई आयोजित लोककला महोत्सव 2026 मध्ये संगीतकार शिवराज साने यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

मुंबई – लोककलेच्या माध्यमातून गेली 25 वर्ष अनेक जिल्ह्यांमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार तसेच अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, पर्यावरण ,स्वच्छता, आरोग्य, शिक्षण ,जातीयता अशा अनेक विषयावर गीत गायनाच्या माध्यमातून कार्यक्रम राबविले आहेत.

लोक कलावंत सांस्कृतिक मंच आयोजित. लोककला महोत्सव 2026 दि. 27 ऑगस्ट 2026 या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे रामदास आठवले (सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार) ऍड व्होकेट आशिष शेलार साहेब (संस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य) संजय शिरसाट साहेब (सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य) भीमराव आंबेडकर साहेब (अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) आनंद शिंदे (सुप्रसिद्ध गायक) डॉ. प्राध्यापक बी.के. डोंगर गावकर (ज्येष्ठ विचारवंत कार्यक्रमाचे अध्यक्ष) चंदनशिवे साहेब (दंगल कार प्रसिद्ध कवी) विश्वजीत शिंदे (प्रसिद्ध गायक संगीतकार) राहुल शिंदे (प्रसिद्ध गायक) राजा कांबळे (प्रसिद्ध पोवाडा गायक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हर्षद कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू शिंदे लिखित नवीन तीन पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला त्रिरत्न. नील नयनी बहुरंग. महापुरुषांच्या विचारांचा गीत गायनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक विष्णू शिंदे .गायक.कवी. संगीतकार. कार्यक्रमाचे स्थळ :- रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी दादर पश्चिम मुंबई
