अब्दुल गफूरशाह न.प उर्दू शाळेत शिक्षकांसाठी ईद मिलनाचा कार्यक्रम संपन्न

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 19 एप्रिल) उमरखेड शहरातील नामवंत असलेल्या अब्दुल गफूरशाह न.प उर्दू शाळा क्रमांक 2 मध्ये तालुक्यातील शिक्षकांसाठी ईद मिलनाचा कार्यक्रम उर्दू शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी आयोजित केला होता.

विशेष म्हणजे ईद मिलन आणि सद्भावना निर्माण या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुसद येथील संत साहित्याचे अभ्यासक सैय्यद सलमान सरांना बोलवण्यात आले होते. त्यांनी आलेल्या शिक्षकांसोबत ईद मिलनाचा उद्देश हा समाजात सद्भावना निर्माण करणे हा असून माणसाला माणुसकीने वागण्याचे प्रशिक्षण म्हणजे रमजान आहे हे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दर्शनवाड साहेब बि. ई. वो, कांबळे साहेब विस्तार अधिकारी, केंद्र सर केंद्र प्रमुख, बुरकुल सर केंद्र प्रमुख, खूपसे सर केंद्र प्रमुख, देशमुख सर केंद्र प्रमुख, मुबिनउल हक सर केंद्र प्रमुख होते.आलेल्या सर्व मराठी भाषिक शिक्षकांना शिरखुरमा देण्यात आला. सर्व उपस्थित शिक्षकांनी या उपक्रमाची प्रशंसा केली.
