ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिक

गावंडे महाविद्यालयाचे रा. से. यो. शिबीरार्थ्यांनी बांधला बंधारा व परिसराची स्वच्छता केली.

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दि. २२ फेब्रुवारी) गोपिकाबाई सीताराम गावंडे वरिष्ठ महाविद्यालय उमरखेडचे राष्ट्रीय सेवा योजना निवासी विशेष शिबीर दत्त ग्राम मरसुळ येथे दि. १७ ते २३ फेब्रुवारी, २०२५ या दरम्यान सात दिवसीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरा दरम्यान विविध कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भरारीने भाग घेतला.

सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी गावाच्या नाल्यावर बांधारा बांधकाम केले त्यासोबत वृक्षारोपण व शोष खड्डे तयार करणे इत्यादी महत्त्वाचे कामे करण्यात आले विद्यार्थ्यांना पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्यात आली व पाण्याची बचत कशी करावी हे सांगण्यात आले.

दुपारच्या बौद्धिक सत्रात महिला सक्षमीकरण बेटी बचाव बेटी पढाव, आर्थिक घडामोडी व युवा विकास या विविध विषयावर पाहुण्यांनी विचार व्यक्त केले. आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. शितल सुर्वे, व प्रमुख पाहुण्यात श्री. बंडू पाटील, डॉ. वसुंधरा शिंदे, डॉ. सविता धोंगडे हे उपस्थित होते.

सूत्रसंचालन शिवम वानखेडे याने केले व आभार प्रदर्शन वैभव विशंभरे हा विद्यार्थी करणार आहे, त्याचबरोबर अंकिता सूर्यवंशी ही स्वच्छतेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव बा. कदम यांच्या मार्गदर्शनात व संकल्पनेतून सर्व कार्यक्रमांची आखणी केल्या गेली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, प्रा. अर्चना मीटके व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!