भारतीय जनता पार्टीचे उमरखेड विधानसभा अधिकृत उमेदवार किसनराव वानखेडे यांनी शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत भरला नामांकन अर्ज

[भव्य नामांकन रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते सामील होते.]
✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 29 ऑक्टोंबर) उमरखेड महागाव विधानसभा मतदान क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी कडून किसनराव वानखेडे अधिकृत उमेदवार यांनी शेवटच्या दिवशी शेकडो नागरिकांच्या उपस्थित उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केला.
आज राजस्थानी भवन येथे मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन त्या ठिकाणी अनेक मान्यवरांनी पक्षाबद्दल आणि किसनराव वानखेडे यांच्या बद्दल आपापली मते व्यक्त केली.
मागील पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये काम करणारे किसनराव वानखेडे यांना ही उमेदवारी भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या अथांग परिश्रमातून मिळाले आहे.

आजी-माजी आमदारांना ढवळून नवीन चेहरा नवा उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पार्टी करून देण्यात आला आहे. मला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिल्यामुळे आणि नितीन भुतडा यांच्या पुढाकाराने मी आज उमेदवारी अर्ज भरला आहे.

माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणारे नामदेव ससाने (माजी आमदार), सुधाकर लोमटे, कैलासराव वानखेडे, अतुल खंदारे, सविता पाचोरे, गजानन कांबळे, असे प्रतिपादन किसनराव वानखेडे यांनी केले.
यावेळी उमरखेड विधानसभा क्षेत्रातील अनेक नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
