वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी ,इलेक्ट्रिक मॅन – अभय डी. रंगारी प्रजासत्ताक गौरव – मानवसेवा पुरस्कार

२०२६ ने सन्मानितमानवाधिकार फाउंडेशन (रजिस्ट्रेशन अंडर मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स ,गव्हर्नमेंट ऑफ इंडिया)कडून अविस्मरणीय सामाजिक कार्याची दखल जीवनप्रवासावर चित्रपट निर्मिती होणारप्रतिनिधी | भंडारा :प्रजासत्ताक म्हणजे केवळ शासनपद्धती नव्हे, तर लोकांच्या स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची आणि समानतेची जाणीव होय.

या प्रजासत्ताक मूल्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखक, मुक्त पत्रकार व वादळी वेदनेचे विद्रोही महाकवी इलेक्ट्रिक मॅन अभय देवाजी रंगारी यांना प्रजासत्ताक गौरव – मानवसेवा पुरस्कार २०२६ ने सन्मानित करण्यात आले हा सन्मान मानवाधिकार फाउंडेशन यांच्या वतीने प्रदान करण्यात आला अभय डी रंगारी यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरणीय व साहित्यिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत जनतेच्या न्याय व हक्कांसाठी बुलंद आवाज उठवला आहे.

अन्याय, शोषण व विस्थापनाविरोधात त्यांनी उभारलेली चळवळ ही प्रजासत्ताक मूल्यांची खरी ओळख ठरत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक विचारधारेवर विश्वास ठेवत अभय रंगारी यांनी समानता, स्वतंत्रता,बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा समाजात प्रचार-प्रसार केला. मतदानाबाबत जनजागृती, संविधान सन्मान, मूलभूत कर्तव्यांची जाणीव आणि शिक्षणाद्वारे प्रबोधन हे त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्रबिंदू राहिले आहेत.

विशेष बाब म्हणजे, त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपट निर्मिती होणारअसून त्यांच्या स्टॅम्प पेपर वर चुनावी जाहीरनामा या एका धाडसी राजकीय निर्णयावर आधारित दृश्य साऊथ चित्रपट “गेम चेंजर” मध्ये दाखवण्यात आले असून, तो निर्णय भारतीय राजकीय इतिहासात न मिटणारी प्रेरणादायी मिसाल ठरत असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.अभय रंगारी सध्या राष्ट्रीय किसान मोर्चा, भंडारा जिल्हा संयोजक म्हणून कार्यरत असून, जनतेच्या न्याय व हक्कासाठी त्यांनी संपूर्ण ताकदीने नेतृत्व केले आहे.

“आदमी देखकर आदमी की पहचान करने वाला आदमी” अशी त्यांची ओळख जनमानसात आहे.आतापर्यंत मिळालेले प्रमुख पुरस्कार :1. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजसेवक पुरस्कार (निवड) – संभाजीनगर2. कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार – मुंबई3. गोल्डन पिकॉक अवॉर्ड – मुंबई4. मानवाधिकार पुरस्कार – अहिल्यानगर5. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार – कोल्हापूर6. जीवनगौरव पुरस्कार – पवनी, भंडारा7. प्रबोधिनी स्टार पुरस्कार (निवड)– चंद्रपूरप्रजासत्ताक सशक्त व गौरवशाली करण्यासाठी जागरूक, जबाबदार आणि मूल्यनिष्ठ नागरिक घडवण्याचे कार्य अभय रंगारी अविरतपणे करत आहेत. समाजहिताला वैयक्तिक स्वार्थापेक्षा प्राधान्य देणारे त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक होत आहे
