उमरखेड तालुक्यातील पिरंजी गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

उमरखेड (दिनांक 15 एप्रिल) तालुक्यातील पिरंजी गावामध्ये भीमराज मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्सवात व आनंदात साजरी करण्यात आली गावात सामाजिक स्तरावर काम करणारे भीमराज मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कराव तेवढे कौतुक कमी आहे. सर्व प्रथम पहिले विहाराची रंगरंगोटी पूर्ण केली, विहाराचा सर्व परिसर स्वच्छ करून विविध स्पर्धा घेऊन भीम जयंती साजरी केली.



पाईप टाकून त्यावर सर्व भीमराज मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दिवसाचे श्रमदान करून मेन रोड पासून दुसऱ्या रोडला जोडणारा रस्ता तयार केला आहे. विहाराजवळ भीम नगर नावाची डिजिटल पाटी तयार करून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनांक 13 एप्रिल रोजी ला सर्व गाव जेवणाचं भोजनदान दिले आहे.


यामध्ये अन्नदान करणारे 16 जणांची समिती समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये पुतळा समितीचे अध्यक्ष भीमराज मित्र मंडळ सखाराम धुळे, मल्हारी दवणे, माजी सरपंच अनंतराव पाईकराव, गणेश पाईकराव, मंगल दवणे,प्रकाश पाईकराव, शाहीर आत्माराम गायकवाड,

गजानन गायकवाड, भाऊराव सावते, प्रभाकर पाईकराव, संजू, शाहीर पाईकराव, देवानंद पाईकराव, बबलू भालेराव, राजाभाऊ दवणे, देवानंद लक्ष्मण पाईकराव, सिद्धार्थ पाईकराव, व भीमराज मित्र मंडळाच्या सहकार्याने भोजनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला आहे.

14 एप्रिल सकाळी ठीक नऊ वाजता रॅलीला सुरुवात करण्यात आली डीजे च्या माध्यमातून सर्व लहान मुले महिला मंडळींनी भीम गीताचा डीजेचा आनंद घेतला आहे. सर्व गावकऱ्यांच्या वतीने भीमराज मित्र मंडळाचे सर्व कार्यक्रमाची नियोजन शिस्तबद्ध लावल्यामुळे आणि यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचे पुष्पदेव पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे. व सूत्रसंचालन देवानंद पाईकराव यांनी केलेआहे.

तर आभार प्रदर्शन सखाराम धुळे यांनी केले बौद्ध वाड्यातील सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.
