माता रमाई सारखा त्याग हा आजच्या काळातील स्त्रिया करू शकत नाही – तेजश्री जैन नगराध्यक्षा
🚨(सम्यक बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!)

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातील चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथिल सम्यक बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तथागत भगवान गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमुर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड नगरीच्या नगरअध्यक्षा सौ. तेजश्री संतोष जैन,सामाजिक कार्यकर्ते गोपालभाऊ अग्रवाल, हिराबाई दिवेकर माजी नगरसेविका, भंते कीर्ती बोधी, नगरसेविक गजूभाऊ रासकर, नगरसेविका सौ. वैष्णवी सागर लहेवार, ईश्वर गोसावी इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित झाले होते. नगराध्यक्षा तेजश्री जैन यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून माता रमाई सारखा त्याग हा आजच्या काळातील स्त्रिया करू शकत नाही असे मार्गदर्शन करून माता रमाई आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्यात.तसेच रात्री 8 वाजता बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम ही आयोजित करण्यात आला होता.

यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सिद्धार्थ दिवेकर अध्यक्ष सम्यक बुद्ध विहार समिती यांनी केले तर आभार प्रदर्शन तुषार पाईकराव यांनी मानले.

या कार्यक्रमाचे आयोजन रमा माता महिला मंडळ यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उषाताई इंगोले अध्यक्षा, भारतीताई केंद्रेकर, उज्वला धबाले,राखी धबाले, बेबाबाई गवंदे, कांचन दिवेकर, भारताबाई दिवेकर इत्यादी अनेक महिलांनी केले होते.
