ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

आनंदी बालपण उपक्रमातून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

बेलोरा ता. पुसद, जि. यवतमाळ येथे “आनंदी बालपण उपक्रम” उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत लहान मुलांना कपडे, स्टोरी पुस्तके, खेळणी, बोर्ड गेम आदी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.सदर साहित्य द किडव्हर्स टाटा फाउंडेशन, मुंबई यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले होते.

हे साहित्य स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने लाभार्थी मुलांना वितरित करण्यात आले.या उपक्रमामुळे लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांमुळे गरजू मुलांना मदत मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या वेळी संस्थेचे अध्यक्ष राजकुमार भगत, उपाध्यक्ष शरद खंदारे, प्रशांत भगत, परमेश्वर भगत, तसेच संस्थेचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!