उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियसामाजिक

धम्म परिषदेसाठी मुळावा सज्ज! पण रस्ता मात्र बेहाल! आंतरराष्ट्रीय पाहुण्यांच्या आगमनापूर्वी रस्ता दुरुस्त करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड: – मुळावा येथील ऐतिहासिक धम्मदूत बुद्धविहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १ आणि २ फेब्रुवारी २०२६ रोजी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे मात्र या परिषदेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन डांबरीकरण करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड डी.के. दामोधर यांच्या नेतृत्वाखाली निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या दोन दिवसीय धम्म परिषदेसाठी श्रीलंकेचे खासदार पूज्य भदंत आतुरलिये रतन थेरो हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबतच अनेक विदेशी भिक्खू राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो उपासक उपासिका दरवर्षी मुळावा येथे धम्म श्रवण करण्यासाठी येतात कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ते बुद्धविहार शांतीनगर या रस्त्याचे केवळ खडीकरण झाले असून त्याचे डांबरीकरण अध्याप रखडलेले आहे,

खडीकरण झालेल्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास आणि वाहन घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तसेच मुळावा ते भांबरखेडा हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहे अशा मंगलमय सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रस्त्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड डी.के. दामोधर यांच्यासह संबोधी गायकवाड तालुकाध्यक्ष उमरखेड, राजूभाऊ दाभाडे, अमोल कांबळे तालुका उपाध्यक्ष, अनाथपिंडक खडसे तालुका संघटक, ऋषिकेश कवडे सोशल मीडिया प्रमुख, गणेश लोखंडे ,दादाराव चौरे, शेख दानिश, सिद्धार्थ धोंगडे तालुका उपाध्यक्ष, राजाराम काकडे आपला सल्लागार, यांनी प्रशासनाला निवेदन देऊन मागणी केली आहे या यावेळी उपअभियंता राठोड यांनी धम्म परिषदेच्या अगोदर रस्ता करण्याचे आश्वासन दिले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!