उमरखेड येथे एशियन पेन्ट कंपनी कडून पेंटर कारागिरसाठी प्रशिक्षण शिबिर


✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड येथे एशियन पेंट्स कंपनी कडून पेंटर कारागिरसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ट्रेनर
राहुल राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली 50 ते 60 पेक्षा अधिक पेंटर कारागिरांनी या शिबिरामध्ये सह नोंदविला आहे. उत्कृष्ट ट्रेनर राहुल राठोड यांनी सर्व पेंटर कारागिर यांना प्रॅक्टिकल सहित प्रोजेक्टर स्क्रीनवर सर्व कलरिंग संदर्भातील व्हिडिओ फोटो दाखवून व साध्या भाषेमध्ये समजावून सांगितले आहे.

तसेच सर्वांचे पेपर सुद्धा यावेळी घेण्यात आली. ट्रेनर यांचे सहकारी श्रवण कुमार सर यांनी सुद्धा उपस्थित पेंटर यांचे दैनंदिन नोंद घेतली आहे. एशियन पेंट्सच्या समूहाने पेंटर कारागीरांसाठी उत्कृष्ट प्रशिक्षण शिबिर आयोजित केल्यामुळे सर्व पेंटर कारागिरामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी उमरखेड शहरातील अनेक पेंटर कारागीर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




