शाहिद भगतसिंग न.प. मराठी शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड: स्थानिक नगर परिषद अंतर्गत शाहिद भगतसिंग न.प. मराठी शाळा क्र.०२ शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष दंत चिकित्सक डॉ. आश्विनी महेश जामनोर ह्या होत्या.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अक्षता साकळे,सविता पाचकोरे माजी नगरसेविका, उमरखेड बस आगार प्रमुख प्रमोदीनी किनाके, पोलीस पाटील संध्या ताई पवार, आरोग्य सेविका स्मन्वयक धोंगडे मॅडम, ब्युटीशीयन अलंका सूर्यवंशी,पोलीस विभागातील जयक्रांती जाधव विचार मंचावर उपस्थित होत्या.

या कार्यक्रमांच्या सुरुवातीला माता सरस्वती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी केले.

या प्रासंगी जयक्रांती जाधव यांनी आपल्या पोलीस कार्याचे महत्व सांगितले. सविता पाचकोरे यांनी महिला संघर्ष या विषयी मत मांडले.
डॉ.अक्षता ताई साकळे यांनी मुलींना कर्तृत्वाने महिलांचे नवे सांगून महिला सक्षमीकरण यावर मत मांडले.

धोंगडे मॅडम यांनी सुंदर कविता सादर करीत स्वछतेचे महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आश्विनी महेश जामनोर यांनी आई-वडीलांचा आदर करावा, शिक्षकांनाच आदर करावं व जीवनात उंच शिखर गाठावे महिला सक्षमीकरण, समानता आणि शक्ती विषयी मत मांडत महिला व विद्यार्थीना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील जी कवडे यांनी केले त्यात त्यांनी सूंदर काव्य करीत स्त्री जीवनातील कार्याचे वर्णन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.सुनील कवडे यांनी पार पडले.

भगतसिंग शाळेचे मुख्याध्यापक श्री आशिष लक्ष्मण राठोड यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्त शाळेतील महिला शिक्षिका अंजली राजपूत मॅडम यांना एक दिवसाचे मुख्याध्यापक पद भूषविण्यास दिले हा महिला दिनाच्या सर्वात मोठा सत्कार त्यांनी केला. याप्रसंगी शाळेतील सर्व महिला शिक्षिका राजपूत मॅडम, सोनेवाड मॅडम, शिवपूजा बारे मॅडम, सोनाळे मॅडम, सोनवणे मॅडम,येलकर मॅडम बोके मॅडम, बारे मॅडम, बसवंत मॅडम सर्व शिक्षकांच्या सत्कार करण्यात आला.

शाळेचे मुख्याध्यापक श्री आशिष राठोड सर यांच्या नियोजन हा कार्यक्रम पार पडण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरता शाळेतील शिक्षक श्री सूर्यवंशी सर,श्री राजे सर, श्री विकास गिरी, श्री मुटकुळे सर, श्री मोरे सर, श्री पाईकराव सर तथा संपूर्ण शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडला.
