पोलीस स्टेशन उमरखेड हददीत अवैध पिवळी रेती वाहतुक करणा-या डुग्गा जप्त करुन चालक यांच्यावर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दिनांक 26/08/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उपविभागात उमरखेड हददीत ईद-ए-मिलाद बंदोबस्त तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी रवाना झाले.

पोलीस स्टेशन उमरखेड हददीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, उमरखेड ते ढाणकी रोडने डुग्गा (टिपर) व्दारे अवैध विनारॉयल्टी चोराटी पिवळी रेती वाहतुक होत आहे अशी माहीती मिळाल्याने नमूद पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे दोन पंचासह मिळालेल्या माहीती प्रमाणे हरदडा फाटा रोडवर सापळा लावला असता एक डुग्गा अवैध विना परवाना पिवळी रेती वाहतुक करुन नेत असतांना मिळून आल्याने डुग्गा (टिपर) क्रमांक MH-04-EL-5753 व त्यामधील पिवळी रेती असा एकूण 4,05,000/- रु मुददेमाल जप्त करुन इसम नामे 1) सय्यद शाहीद सय्यद वहीद वय 20 वर्षे, रा.वार्ड क्रमांक 15 ढाणकी ता.उमरखेड जि. यवतमाळ यांस डुग्गा टॅक्टरसह ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन उमरखेड येथे कलम 303(2) भान्यास सह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 (8), अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात स.पो.नि.धिरज बांडे, पोउपनि/अमोल राठोड, सफौ / मुन्ना आडे, सफौ/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि/रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.




