नगरपालिका शहीद भगतसिंग शाळेकडून “एक पेड मां के नाम” हा उपक्रम राबविला.

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (रिपोर्टर सह संपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक 25 सप्टेंबर) स्वच्छ भारत अभियान (नागरी) अतंर्गत “स्वछता ही सेवा” 2025 या अभियाना अंतर्गत नगर परिषद, उमरखेड, मधील शहीद भगतसिंग न.प.उच्च प्राथा. व माध्य. मराठी शाळा क्र.02 मधील विध्यार्थी यांनी “एक पेड मां के नाम” हा उपक्रम राबविण्यात आला.

शाळेतील विध्यार्थ्यांनी उमरखेड मधील जगदंबा मंदिर परिसरात “मूक अभिनय पथ नाट्य” सादर केले. याची थीम महिला शिक्षिका यांनी तयार केली.या मध्ये झाडे मनुष्य तोडतो. आपली आर्थिक कमाई करून घेतो. पण झाडे तोडल्याने जे जीवन जाण्यासाठी पाणी आवश्यक आहे, त्यासाठी तरफडतो, पर्यायाने मृत्युमुखी पडतो. आणि मग झाडांचे महत्व त्याला कळत.

झाडाची पूजा करून झाडे लाऊन परत आपले जीवन कसं समृद्ध करू शकतो आस संदेश दिला गेला. प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. आई ज्याप्रमाणे सर्वांना ऊब देणारी ताशीची झाडे आहेत म्हणून आईचा आदर तितकाच झाडाचा आदर हे मानून सर्वांनी झाडे लावावेत असा संदेश दिला आहे.

या उपक्रमाचे नेतृत्व शाळेचे मुख्याध्यापक श्री आशिष राठोड सर यांनी भर पावसात हा उपक्रम रावबिला. सहकारी शिक्षक राजपूत मॅडम, वानखेडे मॅडम, पोंगाणे मॅडम, बारे मॅडम, दुधेवार मॅडम, सोनोने मॅडम, बोके मॅडम, घटमाल मॅडम, वैद्य मॅडम, येपुरे मॅडम, मीनल रहाटे मॅडम तसेच मुनेश्वर सर, डॉ. सुनील कवडे सर , राजे सर, साळवे सर, बसवंत मॅडम काळे सर, मार्लेवाड सर,आणि शिपाई राठोड भाऊ व शाळेतील विध्यार्थी व विद्यार्थ्यांनी यात सहभागी झाले.
