उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहर

आ.किसनराव वानखेडे व नितिन भुतडा यांचे प्रयत्नातून उमरखेड अगारास १० एसटी बसेस ची उपलब्धी

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक 15 मार्च) नागपूर-नांदेड, हिंगोली-किनवट या मुख्य मार्गावर तसेच आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यातून मोठ्याप्रमाणात प्रवासी भाविक भक्तगण राज्य परिवहन महामंडळाच्या उमरखेड या एसटी अगारातून येजा करीत असतात. ग्रामिण भागातून देखील दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी नियमित येथील मोटार गाड्यांनी येजा करीत असतात.

वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता येथील अगारास मोटार गाड्यांची मोठ्याप्रमाणात कमतरता भासत होती. त्यामुळे प्रवाश्यांची गैरसोय टाळण्या हेतूने आमदार किसनराव वानखेडे व भाजपा यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी परिवहन मंत्र्यांकडे वारंवार मागणी करून दहा अद्यावत मोटारगाड्या उमरखेड अगारासाठी मंजूर करून घेण्यात यश मिळविले आहे. त्यापैकी पाच मोटारगाड्या या दि.15 मार्च रोजी आगारात दाखल झाल्या आहेत,

तर उर्वरित पाच गाड्या लवकरच उपलब्ध होणार आसल्याची माहिती नितीन भुतडा यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली. आमदार वानखेडे आणि नितीन भुतडा यांच्या एसटी बसेसच्या मागणीस यश प्राप्त झाल्याने अनेक वर्षाची प्रवाश्यांची गैरसोय ही बऱ्यापैकी संपुष्टात येणार असल्याने विविध योजनेतून प्रवास करणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी व जेष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उमरखेड आगारास एसटी बसेस मिळवून दिल्याबद्दल आ.किसनराव वानखेडे व नितिन भुतडा यांच्यावर सर्व स्तरातील प्रवासी बंधू भगिनींनीकडून कौतुकाचा वर्षाव होतांना दिसत आहे.

◆बॉक्स– यवतमाळ जिल्ह्यात केवळ यवतमाळ व उमरखेड या दोनच आगारास प्रत्येकी पाच-पाच अध्यावत मोटारगाड्या उपलब्ध झाल्या असून उर्वरीत मोटारगाड्या या लवकरच उपलब्ध होणार आहेत.श्री.अमृत कचवे- विभागीय नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!