उमरखेडमहाराष्ट्रशहरसामाजिक

परभणी येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी ढाणकी शहर कडकडीत बंद

ढाणकी शहर कडकडीत बंद

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)

✍🏻 करण भरणे सर (ढाणकी सर्कल प्रतिनिधी)

ढाणकी (दिनांक 17 डिसेंबर) परभणी येथे झालेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी परभणी येथील भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडी मृत्यू प्रकरणी आंबेडकर अनुयायी, संविधान प्रेमी व समाजाच्या वतीने मंगळवार 17 डिसेंबर रोजी ढाणकी बंद हाक मध्ये ढाणकी शहराने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ढाणकी शहर कडकडीत बंद केला.

या बंद मध्ये शहरातील सर्व व्यापारी वर्गाने सहकार्य करून बंद शंभर टक्के यशस्वी केला. व्यापारी वर्गांनी प्रतिसाद दिल्यामुळे बंद शांततेत पाळण्यात आला. यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार मनवर साहेब यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की परभणी येथील घटनेत संबंधित जवाबदार असलेल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोशींवर कारवाई करावी आंबेडकरी तरुणांवरील जाळपोळ आणि दंगलीचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, मृतकाच्या कुटुंबास 50 लाखाची मदत द्यावी, मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी समाविष्ट करावे.

शहरांमध्ये आंबेडकर चौकातून रॅली काढून छत्रपती शिवाजी चौक येथे एकत्र येतं भाषने व त्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

शहरातील तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेता बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष मनवर व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!