उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

उमरखेड तालुका गौण खनिज वाहतुकदार संघटना यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन

उमरखेड (दिनांक 23 फेब्रुवारी) उमरखेड मा. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य,यांना दिले निवेदन, वैध व अवैध गौणखनिज उत्खंत्राबाबत सुस्पष्टता आणणे बाबत. उमरखेड तालुका गौण खनिज वाहतुकदार संघटना वरील नम्र निवेदन देतो की, आम्ही खालील सह्या करनारे लोक गौण खनिज वाहतुक रितसर परवाना चा वाहतूक पास घेऊन करीत असतो.

परंतु रितसर परवाना असुन सुद्धा आपले महसूल कर्मचारी आमची वाहने अवैध ठरवून नाहक दंड आकारुन आमच्यावर अन्याय करीत आहे. वैध वाहनावर जबरण शासकिय दंड आकारीत आहे. ज्यांना वाहन तपासण्याचा अधिकार नाही, ते कर्मचारी वाहणे आडवून नाहक त्रास देत आहे.गीट्टी व खड़ी हे मोठ्या दगडावर प्रक्रिया करुन तयार केलेले उत्पादन आहे.महाराष्ट्र महसूल अधिनियम मधील कलम ४८/७ अन्वये वाहन जप्तीचे व दंड लावण्याचे आधिकार तहसिलदार व उपविभागीय आधिकारी यांना नाही.

असे मा. औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय असून सुद्धा बेकायदेशिर पणे बाहणे दंड आकारुन आमच्यावर अन्याय करत आहे.वाहतुक करण्यामध्ये सर्व सुशिक्षीत बेरोजगार तरुण असल्यामुळे ह्या नाहक दंड आकारणी मुळे त्याच्यावर उपासपारीची वेळ येत आहे.मा. महसूल मंत्री महोदयांनी आमच्या अर्जाचा विचार करुन आमच्यावर होणाराअन्यांय दूर करण्यात यावा. हि नम्र विनंतीआपला विश्वासूउमरखेड तालुका गौण खनिजवाहतुकदार संघटना

महसूल मंत्री मा काय निर्णय घेतील यांच्या कडे सर्वचे लाक्ष आहे. जेणेकरून आमच्यावर उपासमारीची पाळी येऊ नये असं महसूल मंत्र्यांनी निर्णय घेतील गौण खनिज वाहतूक संघटना उमरखेड यांनी व्यक्त केले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!