ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

नाबालिक मुलीचा पाठलाग करून छेड काढणाऱ्या युवकाला तत्काळ अटक करून पोक्सो दाखल

✍️ बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍️ करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)

ढाणकी (दिनांक 26 जून) तरुणीची छेड काढणारा दादाराव जळबा धुळे हा ढाणकी मध्ये टॉवर मॅन म्हणून प्रसिद्ध आहे. तो माझा लग्न लावा म्हणून बि. एस. एन एल टॉवर चडून स्टंट करत असतो.

पण आता त्याच्या विरोधात मागील काही दिवसापासून तो चक्क नाबालिक मुलीचा पाठलाग करून त्रास देत असल्याची तक्रार दिली असून बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.

तक्रारीवरून युवक नामे दादाराव जळबा धुळे वय 35 वर्षे राहणार टेंभेश्वर नगर ढाणकी, यांच्या विरोधात पोलीस स्टेशन बिटरगाव येथे अपराध क्रमांक 144/25 कलम 78, 79, 351(2)(3) भारतीय न्याय संहिता. सह.कलम.12 पोक्सो अन्वय गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता. अप्पर पोलीस अधीक्षक,पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, हनुमंत गायकवाड, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक,सागर अन्नमवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार हे करीत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!