महामानवांची प्रतिमा न लावणाऱ्या त्या शाळेचे मान्यता रद्द करा – ढाणकी येथील संविधान प्रेमी नागरिकांचे मागणी
(ढाणकी येथील संविधान प्रेमी नागरिकांचे मागणी)
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✍🏻प्रफुल दिवेकर (तालुका प्रतिनिधी) मो.9503098931

ढाणकी (दिनांक 29 जानेवारी)
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा जातीय मानसिकतेतून न लावणाऱ्या ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक मंडळावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी येथील संविधान प्रेमी नागरिक यांनी दिनांक 28 जानेवारी रोजी निवेदनाव्दारे शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सर्व कार्यालय शाळा कॉलेज या ठिकाणी संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

परंतु ढाणकी येथील ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत मुद्दाम जातीय मानसिकतेतून महामानवांचे प्रतिमा लावण्यात आली नाही.

या अगोदरही संविधान देणे 26 नोव्हेंबर रोजी प्रत्येक शाळेत संविधानाचे पठण करण्याचे आदेश असताना ज्ञानज्योती शाळेत मात्र पालक सभा घेऊन शाळेला सुट्टी देण्यात आले होती.

महामानव आणि संविधान यांचा अवमान करणाऱ्या ज्ञानज्योती इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालक मंडळावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी ठाणेदार पोलीस स्टेशन बिटरगाव, गटशिक्षणाधिकारी

उमरखेड, शिक्षण अधिकारी यवतमाळ यांना येथील आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉनटी विनकरे, पत्रकार ब्रह्मानंद मुनेश्वर, प्रहारचे तालुकाध्यक्ष सय्यद माजीद, काँग्रेसचे साहेबराव वाघमोडे, आजाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, भारत मुक्ती मोर्चाचे प्रकाश कांबळे, युवा शहराध्यक्ष समाधान नरवाडे, पत्रकार स्वप्निल चिकाटे, समाधान राऊत आबा गायकवाड, राजू हनवते, प्रफुल दिवेकर यांनी केली.

तातडीने कार्यवाही न केल्यास शाळा प्रशासनाचे विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.
