(मानवत तालुक्यातील मौ. खरबा येथील घटना)
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक २३ डिसेंबर) तालुक्यातील मौ. खरबा येथील ३ वर्षीय चिमुरडी शिवज्ञा दत्ता निर्मळ या मुलीस स्कुल बसने चिरडल्याची घटना २३ डिसेंबर रोजी घडली आहे.

सदरील चिमुकली आपल्या भावाला स्कुल बस मध्ये सोडवण्यास दररोज सोबत येत असे परंतु आज सकाळी जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयाची स्कुल बस क्रं. एम. एच – २२ – ३६४८ ही स्कुल बस आली असता चालकाच्या दुर्लक्षामुळे समोरील चाकाखाली आल्याने चिमूकलीवर काळाने घाला घातला ३ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच मानवत पोलीस घटना स्थळी दाखल होऊन मृत देह शवविव्छेदना साठी मानवत ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला स्कुल बसचे चालक रामेश्वर नामदेव पितळे मानवत पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मानवत पोलीस करत आहेत.

या दुर्घटनेमुळे खरबा गावावर शोककळा पसरली आहे.
