खेळमहाराष्ट्रमानवतविशेषशहरशैक्षणिक

केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत रंगली गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक २६ डिसेंबर) दि. २२ डिसेंबर हा दिन दर वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.

या निमित्त सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी मानवत तालुक्यातील मौ. ताडबोरगाव जिल्हा परिषद शाळेत दुपार सत्रात थोर गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त भव्य गणित प्रश्न मंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.

झटपट फेरी, नाद फेरी, बहुपर्यायी फेरी, भूमिती फेरी व बम्पर फेरी अशा पाच फेऱ्यात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत न्यूटन गट, आर्यभट्ट गट व पायथा गोरस गट या तीन गटात स्पर्धक विभागले जाऊन अतिशय अटीतटीची स्पर्धा विध्यार्थ्यानी अनुभवली. सौ. नंदा शिंदे यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत न्यूटन गटाने प्रथम तर आर्यभट्ट गटाने द्वितीय क्रमांक पटकावला.

या प्रसंगी सावरगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. ओम मुळे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला विजेत्या स्पर्धकांना मुख्याध्यापक श्री. सावळे यांच्यातर्फे विशेष पारितोषिक केंद्र प्रमुखांच्या हस्ते देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. माटेगांवकर, श्री. बलभीम माथेले, श्री जोजारे, श्री. आदिल शेख, सौ. कारंडे, सौ. छाया प्रधान, सौ. कुकडे, श्रीमती रुखसाना, श्री कलीम, श्री जुनेद यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!