Uncategorized

राष्ट्रीय काँग्रेस कडून साहेबराव कांबळे यांनी हजारोच्या कार्यकर्त्याच्या साक्षीने भरला नामांकन उमेदवारी अर्ज

✒️ सिध्दार्थ दिवेकर (उपसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक २८ ऑक्टोंबर) उमरखेड विधानसभा ८२ क्षेत्रामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून साहेबराव कांबळे यांनी हजारो कार्यकर्त्याच्या साक्षीने उमेदवारी नामांकन अर्ज आज दाखल करण्यात आला.राजस्थान भवन येथे नामांकन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले होते.सदर रॅली ही महागाव रोड वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर लगेच छ.शिवाजी महाराज चौक येथील छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुसद रोडवरील तहसील येथे संपन्न करण्यात आली.

सदर रॅलीमध्ये “साहेबराव कांबळे तुम आगे बढो.! हम तुम्हारे..!!साथ है”..!!!”जीतेंगा भाई जीतेंगा..साहेबराव कांबळे जीतेंगा” असे नारे सर्व कार्यकर्ते देत होते.उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये मागील दोन वर्षा पासून साहेबराव कांबळे यांनी प्रत्यक्ष गाव भेट करून प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये आपले घर निर्माण केले आहे.

आणि काँग्रेस पक्षाला जिवंत ठेवण्याचे मोठे काम केले आहे.कांबळे यांनी विविध सामाजिक कार्याचा पुढाकार घेऊन गरजूंना मदत करण्याची ठाम निर्णय घेऊन सर्वांना मदत करत होते आणि करत आहेत.

गोपाल अग्रवाल यांच्या पुढाकाराने अथांग प्रयत्नातून कांबळे यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांनी उमेदवारी नामांकन अर्ज दाखल केल्यामुळे सर्व कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांच्या नवा जोश निर्माण झालेला आहे.उमरखेड विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिक हे साहेबराव कांबळे यांच्या सोबत आहेत अशी अनेक सामान्य नागरिकांनी आपले मत व्यक्त केले आहे.यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ नेते नंदकिशोर अग्रवाल, तातू देशमुख, राम देवसरकर, (जिल्हा परिषदेचे माजी सभापती), डॉ. नदीम, बाळू पाटील चंद्रे (माजी सभापती), गोपाल अग्रवाल,सोनू खतीब, इत्यादी अनेक कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!