ताज्या बातम्यामहाराष्ट्रशहरसामाजिक

साने कला मंचाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उरुळी कांचन :- चवदार तळ्याचे पाणी पिऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ तहान भागवली नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या अस्पृश्यतेच्या बेड्या तोडण्याचा ऐतिहासिक प्रारंभ केला असल्याचे माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.

साने संगीत क्लासेस व साने कला मंचच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काकडे बोलत होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. भारतीय संविधानाचे शिल्पकार, दीन दुबळ्यांच्या हक्कांसाठी लढणारे सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन असे मत माजी शिक्षणाधिकारी प्रभाकर खरात यांनी सांगितले.

यावेळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती हेमलता बडेकर, पंचायत समितीच्या सदस्या कोमल गणेश कांबळे, माजी शिक्षण अधिकारी प्रभाकर खरात, माजी पर्यवेक्षक बाळकृष्ण काकडे, पुणे जिल्हा महानुभाव परिषदेचे प्रचारमंत्री अमोल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय तुपे, प्रा सुरेश वाळेकर, पत्रकार सुवर्णा कांचन, सुनिल तुपे, साने कला मंचाच्या अध्यक्षा रेखा साने, पंकज लोंढे आदी विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शिवराज साने यांनी सांगितले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन केले. त्यांच्या जीवनात अनेक संकटं आली परंतु ते डगमगले नाहीत, निराश झाले नाहीत. त्यांनी हिमतीने संकटावर मात केली. संकटंसमयी ते रडणारे नव्हते, तर लढणारे होते. ते संकटाला संधी समजणारे होते, म्हणून आज त्यांचे नाव जगविख्यात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भोसले यांनी केले. आभार सुनिल तुपे यांनी मानले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!