खोटी सही करुन पेसा निधी उचल केल्यामुळे कार्यवाही ची केली मागणी

श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे
श्रीक्षेत्र माहूर:- नंदू शेषेराव दाळके पेसा समिती अध्यक्ष पाचोंदा व सपना मुंगशीराम शेडमाके पेसा समिती सदस्य यांनी केली आहे.

माहूर तालुक्यातील मौजे पाचुंदा ता. माहूर येथील पेसा अंतर्गत गाव असल्यामुळे पेसा या खात्यामध्ये एकुण रक्कम 1,97,398/-रु. एवढी रक्कम होती. त्यापैकी आम्ही दोघे अध्यक्ष व सदस्य 65,000/-रु च्या चेक उचल करण्यासाठी चेक वरती सही केली.

आमच्याकडे तीन चेक पैकी पहिला चेक 20,000/-रु अविनश विश्वनाथ तोरकर, दुसरा चेक आनंदा फरिदा पवार-20,000/-रु, तिसरा चेक मेघराज हरसिंग जाधव-25,000/ रु. सदरील चेक घेऊन आमच्याकडे अविनाश विठ्ठल गाडे, दादाराव महादु तोरकड हे दोघे आले होते. अंगनवाडी साहित्य खरेदी करण्या करीता आम्ही सदरील चेक वरती सह्या केल्या.
गाव पेसा समितीच्या सांगण्यवरुन आम्ही SBI बँकेचे स्टेटमेन्ट काढले असता त्यामध्ये केवळ 12,398/-रु.आढळून आले. सदरील स्टेटमेन्ट मध्ये दोन चेक आमच्या दोघांच्या खोट्या सह्या करुन 1,20,000/- रु. रोख रक्कम उचल केल्याचे आढळुन आले.

सदरील स्टेटमेन्ट मध्ये राजेश बाबुराव कड यांच्या नावे 1,00,000/- रु. व दूसरा चेक प्रमोद लालसिंग रा – 20,000/-रु दिल्याचे आढळुन आले. हे दोन्ही व्यक्ती आमच्या गावातील रहिवासी नसुन ग्रामसेवक व सरपंच या दोघांच्या सहमतीने सदरील व्यक्तींना पेसा समिती अध्यक्ष व सदस्य आमचे चेक वरती सही न घेता ग्रामसेवक व सरपंच यांनी आमची खोटी सही करुन या दोन व्यक्तीना चेक दिले.

त्या चेक घेणारे दोन व्यक्तींनी गावामध्ये कोणते कामे केली किंवा पैसे कोणाला उचलुन दिले, बँके मध्ये पैसे उचल करतांना या दोन व्यक्ती सोबत पाचोंदा येथील कोणती व्यक्ती किंवा सदस्य होती.
यांची बँकेची सि.सि.टी.व्ही. चेक करण्यात यावी किंवा पैसे बँकेच्या बाहेर कोणत्या व्यक्तीला आनुन दिले त्याची चौकशी करण्यात यावी.

पेसा समिती चे चेक बुक आमच्या कडे नसते. चेक बुक ग्रामसेवक व सरंपच यांच्याकडे असते. करीता मा. साहेबांनी राजेश बाबुराव कड व प्रमोद लालसिंग याची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती नंदू शेषेराव दाळके पेसा समिती अध्यक्ष पाचोंदा सपना मुंगशीराम शेडमाके पेसा समिती सदस्य यांनी केली आहे.
