बांधकामावर काम करण्यासाठी चल म्हणत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

(दोघा विरुद्ध मानवत पोलिसांत गुन्हा दाखल ; करंजी येथील घटना)
✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)
✍🏻 प्रविण घागरे (मानवत प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत (दिनांक २६ जानेवारी) बांधकामावर काम करण्यासाठी चल म्हणत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी मानवत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानवत तालुक्यातील मौ. करंजी येथील गवंडी (मिस्त्री) कामगार रामेश्वर मारोतराव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. गावातील नामे बालासाहेब वाघ यांच्या घराचे बांधकाम करण्यासाठी त्यांचे कडे रोजंदारीवर एक हजार रुपयेने कामाला गेलो असता ऍड व्हान्स म्हणून त्यांनी २ हजार रुपये दिले होते.

त्यांचे कडे ०७ हजार रुपये रक्कम बाकी राहीले होते २१ जानेवारी रोजी प्रभाकर थोरवट यांचे घराचे बांधकाम चालु असल्याने ते रोजंनदारीने कामावर गेलो दुपारी 2:30 वाजण्याचे सुमारास जेवण करण्यासाठी सुट्टी झाल्याने गावातील बाबाराव जाधव यांच्या हॉटेलसमोर बसलो असता गावातील बालासाहेब वाघ व त्यांचा मुलगा रतन बालासाहेब वाघ दोघे जवळ आले.

व बालासाहेब वाघ मला म्हणाले की, तु माझे बांध कामावर काम करण्यासाठी चल तेंव्हा मी त्यांना म्हणालो की, माझे कामाचे तुमच्याकडे राहीलेले पैसे आधी दया नंतर मी कामाला येतो असे म्हणताच बालासाहेब वाघ यांनी गालात चापट मारली तर रतन वाघ याने दोन्ही हात धरले व बालासाहेब वाघ यांनी तेथे पडलेली लाकडी काठी घेतली व माझे डावे हाताचे पोटरीवर मारले तेंव्हा काठी तुटुन त्याचा तुकडा माझे उजवे डोळयाचे खाली लागुन दुखापत झाली तेथे असलेल्या उपस्थित व्यक्तींनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला त्या नंतर मला म्हणाले की, तु बाहेर ये तुला खतम करुन टाकतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी रामेश्वर मारोतराव जाधव फिर्यादी वरून बालासाहेब वाघ, व रतन वाघ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५१ (२), ३ (५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तापास मानवत पोलीस करत आहेत.
