ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

भिम टायगर सेनेच्या वतीने पोलीस स्टेशनला शिवजयंती साजरी

सात वर्षापासून अविरत रुग्णसेवा करणाऱ्यांचा सत्कार संपन्न

भीम टायगर चा मोफत ऑटो ॲम्बुलन्स चा स्तुत्य उपक्रम

पुसद / अपघातग्रस्त तथा गरजू रुग्णाला तातडीची उपचार सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठीचे भिम टायगर सेनेच्या मोफत ऑटोॲम्बुलन्स सेवेला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने रुग्णसेवकांचा पोलीस स्टेशन पुसद शहर येथे पोलीस अधिकारी व डॉक्टरांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजा समाजात सामाजिक भावना वाढविण्याच्या सामाजिक हेतूने भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात गावोगावांच्या संघटनांचे कार्यकर्ते सदोदित कार्य करीत असतात. भिम टायगर सेना ही रस्त्यावर काम करीत असल्याने सामान्यांच्या हाल अपेष्टांची जाणीव असल्याने अपघातग्रस्तांना वेळोवेळी न मिळणारे उपचारामुळे मृत्यूंची संख्या वाढलेली आहे.

तसेच अनेक गरजू रुग्णांनाही वेळेवर उपचाराची सुविधा उपलब्ध होऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी मदतीची सेवा करावी या उदात्त भावनेने भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते मारोती भस्मे यांच्या संकल्पनेतून भीम टायगर ॲम्बुलन्स सेवा सन 2018 पासून कार्यरत झाली. ऑटो ॲम्बुलन्स सेवेतील 30 ऑटो चालक हे आपल्या स्वखर्चातून अपघात ग्रस्त तथा गरजू रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात तातडीने व मोफत पोहोचवण्याचे कार्य करीत असतात.

या रुग्ण सेवेमुळे भिम टायगर सेनेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मोफत ऑटो ॲम्बुलन्सच्या सेवेच्या कार्यामुळे अनेकांचे जीव वाचवण्याची सेवा घडल्याचा अत्यानंद व समाधान ऑटोचालकांना आहे. अशा सेवा धार्‍यांच्या कार्यावर कौतुकाची थाप पडणे आवश्यक असल्याचे बाब काय पोलिस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त चे अवचित्य साधून 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कार्यक्रमाचे आयोजनातून ऑटोचालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नव्याने रुजू झालेल्या या सेवा कार्या चे भिम टायगर मोफत ऑटो ॲम्बुलन्स सेवेच्या सदस्यांचे नाव मोबाईल नंबर चे फलकाचे उद्घाटन समाजभूषण भीमराव कांबळे व पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

ऑटो ॲम्बुलन्स सेवेच्या माध्यमातून कोरोना काळात रुग्णांना करण्यात आलेली मदत, एस आर पी एफ च्या वाहनाला झालेल्या अपघातात सांडवा मांडवा येथील अपघातात शासकीय ॲम्बुलन्स येण्याच्यापूर्वीच ॲम्बुलन्स चे सर्व ऑटो त्या ठिकाणी पोहोचून जखमींसह त्यांचे साहित्य सुद्धा सुरक्षित पोहोचण्यास सेवा केली होती

व त्यानंतर ही सेवा अविरत चालू असल्याचे व यानंतरही ऑटो ॲम्बुलन्स सेवेतील चालकांच्या वाढत्या संख्येमुळे आणखी मोठ्या प्रमाणात करणे शक्य होत असल्याची माहिती भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून दिली. त्यानंतर ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून सेवेच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. अपघात त्याच्या ठिकाणी व इतर वेळेस नागरिक जखमी झाल्यानंतर पोलिसांनी सुद्धा एखाद्याला विनंती केली तर ते मदतीसाठी समोर येत नाही त्यावेळी आम्हाला पॉलिसी खात्या दाखवून मदत मिळवून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात वाचवणे ची व्यवस्था करावी लागते.

अशा या संवेदनशील समाजात भिम टायगर सेनेच्या मोफत ॲम्बुलन्स ची सेवा नक्कीच पोलिसांनाही मदतीची ठरवून लोकांचे जीव वाचवण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचे सांगत या जीव वाचविणाऱ्या समाजकार्या चा उपयोग सर्वांनी घ्यावा.

असे आव्हान सुद्धा यावेळी त्यांनी केले. त्यानंतर डॉ.अमोल मालपाणी डॉ. शिवाजी भुरके व डॉक्टर राजेश वाढवे यांच्यासह धम्मभूषण भीमराव दादा कांबळे यांनी सुद्धा ॲम्बुलन्स सेवेच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोबतच वसनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव, उपनिरीक्षक सागर दानवे उपजिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख निलेश शेंबडे आदिवासी समाज भूषण पुरस्कार प्राप्त मारुती भस्मे, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त राजेश ढोले सामाजिक कार्यकर्ते शितल वानखडे प्राध्यापक नरेंद्र जाधव प्राध्यापक साठे या मंचावरील प्रमुख मान्यवरांनी सुद्धा या सेवा कार्यासाठी भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर दादा कांबळे यांचे कौतुक केले.

यावेळी ऑटो ॲम्बुलन्स चालक संघटनेचे अध्यक्ष सचिन वंजारे, विनोद जाधव निलेश नरवाडे संतोष गावंडे दत्ता तांबारे सिद्धार्थ बर्डे निलेश कांबळे संतोष धरणे विष्णू वाघमारे व ऑटो ॲम्बुलन्स चे सर्व पदाधिकारी यांचा मान्यवरांच्या हस्ते भगवा शेला व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी तर उपस्थित आमचे आभार विष्णू सरकटे यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भीम टायगर सेनेचे प्रभाकर खंदारे जनार्धन झोडगे दीपक गायकवाड विष्णू सरकटे श्रीराम दोडके, रवी सिंगनकर राजकुमार पठाडे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!