उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळराजकियशहरसामाजिक

पाटील नगर ते सुमेधबोधी बुद्ध विहारापर्यंत रस्त्याचे काम तात्काळ करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी!

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड दिनांक 30 जानेवारीच्या आत काम करण्याचे मुख्य अधिकाऱ्यानी दिले आश्वासन उमरखेड: शहरातील पाटील नगर ते सुमेध बोधे बुद्ध विहारापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था झाली असून त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असल्याने पावसाळ्यामध्ये अनेकांचे छोटे-मोठे अपघात झाले आहेत म्हणून या रस्त्याचे काम त्वरित करावे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 15/7/2025 रोजी तत्कालीन मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा करण्यात आला,

परंतु मध्यंतरी निवडणुका लागल्याने तो रस्ता मात्र झाला नाही आणि आज पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष ॲड डी के दामोधर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी उमरखेड नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे जर हा रस्ता तात्काळ सुरू नाही केला तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रचंड मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

यावर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी 7 दिवसाच्या आत या रस्त्याचे काम करण्यात येईल असे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले यावेळी संबोधी गायकवाड तालुकाध्यक्ष उमरखेड, राजूभाऊ दाभाडे अमोल कांबळे तालुका उपाध्यक्ष ,ऋषिकेश कवडे सोशल मीडिया प्रमुख ,अनाथपिंडक खडसे तालुका संघटक ,दादाराव चौरे, गणेश लोखंडे, धम्मपाल कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!