मकर संक्राती दिना निमित्ताचे औचित्य साधून खास महिलांसाठी सोहळा सख्यांचा कार्यक्रमाचे आयोजन — सरोजताई देशमुख
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466
उमरखेड (दिनांक २८ जानेवारी) प्रियदर्शनी इंदिरा गांधी शिक्षण संस्था द्वारा संचालित माध्यमिक विद्यालय व देशमुख कनिष्ठ महाविद्यालय उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने संस्थेच्या संचालिका शिवमती सरोजताई देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांती दिनानिमित्त औचित्य साधून खास महिलांसाठी सोहळा सख्यांचा हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यानिमित्त आयोजित सोहळ्यास सोहळ्याचे उद्घाटक म्हणून प्रतिभाताई पवार (इंजिनिअर जिल्हा परिषद यवतमाळ, समाजसेविका, नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड प्राप्त तसेच दादासाहेब फाळके पुरस्कार 2025 प्राप्त) आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान सौ. लीलावती मारोतराव चंद्रवंशी रा.टाकळी नवी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड शहराचे दिवंगत आमदार श्रीमान किसनराव वानखेडे

यांच्या सुविद्य पत्नी उज्वलाबाई वानखेडे, संस्थेचे सचिव श्रीमान नंदकिशोर देशमुख सर यांच्या मातोश्री सौ. शांताबाई भगवानराव देशमुख, आशाताई कलाने (महिला आघाडी तालुकाप्रमुख उमरखेड), रेखाताई गवळी (माजी बाल विकास सभापती उमरखेड नगरपरिषद उमरखेड),

वंदनाताई वानखेडे(माजी तालुकाध्यक्ष) , माधुरीताई देशमुख , (पर्यावरण समिती अध्यक्ष), डॉ.सौ. वंदनाताई कदम मरसूळकर, सौ. आशाताई गोरे , सौ.पूजाताई धुळे , ज्योतीताई मुंडे, रजनी ताई मुडे, नरवाडे ताई (पो. पा. बिटरगाव), रूपालीताई देशमुख उपस्थित होत्या.

उपस्थित सर्व मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता राष्ट्रमाता माॅ जिजाऊ तसेच माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आणि सोहळा सख्यांच्या सोहळ्याच्या उद्घाटक प्रतिभाताई पवार यांचा व सौ उज्वलाबाई वानखेडे यांचा शाल व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यानंतर कार्यक्रमाची सुरुवात कोमल ताई यांनी केली यामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये स्त्रियांसाठी एक मिनिटात मुला मुलींचे नावे घेणे, उखाणे घेणे अशा मनोरंजक स्पर्धेचे आयोजन होते विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू संस्थेच्या संचालिका सौ देशमुख मॅडम यांच्या हस्ते देण्यात आल्या.

यानंतर या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ते म्हणजे प्रथम पारितोषिक पैठणी साडी यासाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये प्रथमतः संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले.

असून यामध्ये ताईबाई गायकवाड या विजय ठरल्या व पैठणीच्या पहिल्या मानकरी म्हणून घोषित करण्यात आल्या, त्याचबरोबर लिंबू चमचा या स्पर्धेमध्ये प्रियंका ताई पवार यांनी पैठणी प्राप्त केली आणि शेवटची तिसरी स्पर्धा ती म्हणजे तळ्यात मळ्यात यामध्ये मीनाताई पुंडलिक चंद्रवंशी यांनी पैठणी जिंकली त्याचबरोबर प्रोत्साहन पर बक्षिसामध्ये स्वाती विलास मादसवार यांनी बक्षीस प्राप्त केले.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व स्पर्धा पार पडल्या. खरोखरच शिवमती सरोजताई देशमुख यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे कारण त्यांनी खास महिलांसाठी हा जो सोहळा आयोजित केला होता त्या सोहळ्यास स्त्रियांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि मनसोक्त आनंद लूटला.

कार्यक्रमाचे उद्घाटक प्रतिभाताई पवार यांनी महिलांना मोलाचं मार्गदर्शन केल. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या आयोजक संस्थेच्या संचालिका सौ. देशमुख मॅडम यांनी महिलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी महिलांनी घरापुरते मर्यादित न राहता घराबाहेरील जगाचे वास्तव्य काय असते याची जाणीव करून दिली व अन्याय सहन न करता, कुणी आपल्याला मदत करेल याची वाट न पाहता अन्यायाला आपण स्वतः प्रतिकार करावा असे प्रतिपादन त्यांनी केले.उपस्थित सर्व महिलांना हळदी कुंकू लावून तिळगुळ व भेटवस्तू सौ. देशमुख मॅडम यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

प्रियदर्शनी महिला मंडलच्या सदस्य रजनी मुडे, सुनीता कांबळे यांनी सहकार्य केले सोहळ्याला उपस्थित सर्वांना अल्पोपहार देण्यात आले कोमल सोनटक्के यांनी आपल्या सूत्रसंचालन मधून महिलांना मंत्रमुग्ध केले. व शेवटी संस्थेच्या संचालिका शिवमती सरोज देशमुख मॅडम यांनी महीलाना शुभेच्छा देउन आभार मानले.
