बौद्धगया प्रकरणी आजाद समाज पक्षाची एस डी ओ कार्यालयावर धडक (बुद्धिस्ट टेम्पल एक्ट रद्द करण्याची मागणी)

उमरखेड (दि. 20 मार्च) बौद्धांचे श्रद्धास्थान असलेले बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या 1949 चा बुद्धिस्ट टेम्पल ऍक्ट रद्द करा या मागणीसाठी आजाद समाज पक्षाच्या वतीने एस डी ओ कार्यालया समोर दिनांक 19 मार्च रोजी धरणे आंदोलन करत तीव्र निदर्शने करण्यात आली, बिहार बुद्धगया येथे बौद्ध भिक्कू बुद्धगया मुक्ती आंदोलनासाठी गेल्या महिन्याभरापासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.

भारतासह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत, याच आंदोलनाला पाठिंबा म्हणून आजाद समाज पार्टी उमरखेड यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करीत जोरदार निदर्शने करण्यात आली,

यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी एफडीओ कार्यालयाकडे मोर्चा वळवीत पैदल मार्च काढत उपविभागीय कार्यालयावर धडक देत जोरदार घोषणाबाजी केली, यावेळी बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात ताब्यात द्या, 1949 चा बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट रद्द करा, प्रबंधन समितीवर बुद्धांची नियुक्ती करा या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले,

यावेळी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी भाउ विणकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव, माजी आमदार विजयराव खडसे, शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, सुधाकर लोमटे, शाहरुख पठाण, विद्वान केवटे मार्शल विनोद बर्डे सचिन वाहुळे, युवा शहराध्यक्ष अथर खतीब गोलू मुनेश्वर, समाधान राऊत रवी पडघणे, गौतम कांबळे, ऍड नवसागरे, किरण दवणे, सुधाकर कदम, आत्माराम आडे,

पत्रकार बबलू भालेराव, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, राहुल धुळधुळे, नागेश पाटील, सीमा गायकवाड,अंबिका कांबळे सुनीता कांबळे,वदना कांबळे कविता कांबळे, गोदावरी कांबळे सुवर्णा कदम सुजाता दवणे,एड अनिल हनवते, बाळा धोंगडे, रवींद्र हापसे, यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
