उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

संविधान उद्देशिका फलका चे वितरण

(एमपीजे च्या संविधान सर्वांसाठी अभियाना अंतर्गत उपक्रम)

✒️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

उमरखेड दिनांक २६ जानेवारी रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि त्याच्या मूलभूत मूल्यांबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी मुव्हमेन्ट फॉर पीस अँन्ड जस्टीस फॉर वेलफेअर (एमपीजे ) राज्यव्यापी “सर्वांसाठी संविधान”अभियान राबविण्यात आले.

या अभियाना अंतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय , पोलीस उपविभागीय कार्यालय , नगर परिषद मुख्याधिकारी कार्यालय , आगार व्यवस्थापक कार्यालय, पोलीस स्टेशन, गटाशीक्षण अधिकारी

कार्यालय, कृषी महाविद्यालय , गो .सि गावंडे प्राचार्य कार्यालय, इंदीरा गांधी महाविद्यालय, मुख्याध्यापक जिल्हा परिषद मुलांची शाळा कार्यालय , सार्वजनिक बांधकाम कार्यालय आदी शासकीय कार्यालय , महाविद्यालय तसेच शाळां मध्ये संविधान उद्देशिकेचे बॅनर वितरीत करण्यात आले.

या प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फेरोज अन्सारी , सुनिल चिंचोलकर , उत्तम बरवड , देवानंद मोरे , रेखाताई गायकवाड, स्वरांजली वाघमारे ,रसुल पटेल , प्रा गजानन दामोदर , मोहसीन राज , सैय्यद रजा,

डॉ फारुक अबरार , समीर अहेमद , सिध्देश्वर दिवेकर , संजय मोरे , राहुल सुर्य, साहेबराव कदम , वैशाली कवडे , मिनाज अहेमद , तस्लीम अहेमद , अन्सार हुसैनी ,मोनिका भगत आदी संघटनेच्या कार्यकर्ता सह विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!