ताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवतशैक्षणिक

पंधरा वर्षानंतर माजी विद्यार्थी एकत्र ; शालेय जीवनातील जुन्या आठवणींना दिला उजाळा

माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

✍🏻बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे (मानवत/प्रतिनिधी) मो. 8308755238

मानवत:- (दिनांक ०३मार्च) मानवत येथील श्रीमती सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालयात सण – 2010 मध्ये इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या माजी विदयार्थ्यांचा स्नेह मेळावा आज ०२ मार्च रोजी मानवत तालुक्यातील मौ. रूढी येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी तब्बल पंधरा वर्षा नंतर माजी विदयार्थ्यांची भेट झाली आणि माजी विदयार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनात घडलेल्या अनेक जुन्या आठवनींना उजाळा दिला धावत्या युगा नुसार जुन्या मित्राना भेटून चर्चा करणे आता फार दुर्मिळ झाले झाल्याचे दिसून येत आहे.

परंतु शालेय जीवनातील जुन्या आठनींना उजाळा मिळावा यासाठी विदयार्थ्यांनी हा स्नेह मेळावा आयोजित केला होता मेळाव्यात सण – 2010 चा बॅच मध्ये इयत्ता 10 मधील शिक्षण घेणारे माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

तब्बल पंधरा वर्षानंतर माजी विदयार्थ्यांना भेटण्याचा योग आला यावेळी विदयार्थ्यांनी शालेय जीवनातील घडलेले किस्से आणि आपण काम करत असलेल्या क्षेत्रात माहिती देऊन विविध घटना सांगत त्यावर चर्चा केली व पुन्हा त्या घडलेल्या घटना ताज्या केल्या यावेळी 2010 मधील इयत्ता 10 वी बॅच चे माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

उपस्थित सर्व विदया र्थ्यांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेऊन जुन्या घटना बाबत चर्चा करून घडलेल्या घटना ताज्या केल्या.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!