
✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✒️प्रविण घागरे (मानवत तालुका प्रतिनिधी) मो.8308755238
मानवत :- (दिनांक २१ डिसेंबर) तालुक्यातील मौ. सावळी येथे २० डिसेंबर रोजी महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती गठीत करण्यात आली.

यावेळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी श्री. गोविंद काळे यांची निवड झाली.

गावातील किरकोळ वाद आणि तंटे हे गावातच समोपचाराने मिटावेत या उद्देशाने तालुक्यातील गावा गावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम व समिती गठीत करण्यात येत असून मानवत तालुक्यातील मौ. सावळी येथे २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत ही निवड प्रक्रिया पार पडली.

गेल्या काही दिवसापासून प्रलंबित असलेल्या तंटामुक्त समितीचे गठण करण्यात आले यावेळी श्री.गोविंद काळे यांनी २८५ मताधिक्य घेत विजय मिळवला व महात्मा गांधी तंटामुक्त गाव सावळी समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाली
निवडी त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
