ताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रमाहुर श्रीक्षेत्रसामाजिक

‘ईद’ च्या पार्श्वभूमीवर माहूर पोलिस ठाण्यात शांतता समिती ची बैठक!

✍🏻समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र माहूर (दिनांक 4 जून) शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत,दरवर्षाप्रमाणे बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा,कायद्याने संमती दिलेल्याच प्राण्यांची कुर्बानी द्यावी व कायद्याचे पालन करावे,कोणाच्या भावना दुखणार नाही, याची काळजी घ्यावी. सण साजरा करताना पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी व्यक्त केले.

ईद च्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन आज दिनांक ३ मंगळवार रोजी करण्यात आले होते.

यावेळी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगीना मशीद चे सदर ताहेर आली, जामा चे मशीद नसीर जलाल,गौशिया मशीद चे जमीर मलनस, मदिना मशीद चे गफूर सौदागर ,नगरसेवक प्रतिनिधी निसार कुरेशी, असलम छायटीया, वाशिम कुरेशी,करीम शहा,फयाज शेख,सहाय्यक पोलिस निरीक्षक पालसिंग ब्राह्मण,जमादार चौधरी,गोपनीय शाखेचे जाधव, यांची उपस्थिती होती.

भाईचारा- जातीय सलोखा नेहमीच अबाधित ठेवण्याची आपल्या शहराची परंपरा आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत. पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत उत्सव आनंदात साजरे करावेत,प्रेम,भक्ती व कृतज्ञता व्यक्त करत असताना त्याग, बलिदान,सेवा,समर्पणाचा संकल्प,वचन व इरादा व्यक्त करणे व यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हजरत इब्राहिम अलैहीस्लाम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल अलैहीस्लाम यांच्या त्याग व बलिदानाच्या स्मृतीप्रीत्यर्थ बकरी ईद सणसाजरा करण्यात येतो.

आपल्याकडील प्रिय वस्तू दान करण्याची वृत्ती सर्वांना अंगीकृत व्हावी यासाठी हा सण साजरा केला जातो.कायद्याने संमती दिलेल्याच प्राण्यांची कुर्बानी द्यावी व कायद्याचे पालन करावे.

आपल्या एखाद्या कृत्यामुळे संपूर्ण समाजालाच अपमानित व्हावे लागेल किंवा समाजावरच आक्षेप येईल असे कृत्य कोणीही करू नये.असे आवाहन नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी केले.

तर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी कायदा तोडणाऱ्या काही चुकीच्या कृत्यांमुळे पोलिसांना गुन्हे दाखल करावी लागतात, याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला ,कुटुंबाला भोगावे लागतात.आपल्या हातून कायद्याचा भंग होणार नाही असेच आपले आचरण ठेवावे.बकरी ईद आनंदात व शांततेत साजरी करावी. व्हाट्सअप, फेसबुक या माध्यमांचे वापर करताना इतर धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे संदेश किंवा पोस्ट टाकू नयेत.

प्रत्येक समाजामध्ये समाज विघातक वृत्तींची काही लोक असतात, त्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे, मात्र याचे दुष्परिणाम संपूर्ण समाजाला ,कुटुंबाला भोगावे लागतात याची जाणीव ठेवावी, माहूर शहराचासामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित आगामी बकरी ईद शांततेत साजरी करावीअसे मत व्यक्त केले.

या वेळी मुस्लिम समाजाच्या वतीने पोलिस प्रशासनाला सहकार्य असेल कुठलीचे बेकायदा कृत्य होणार नाही याची खबरदारी घेतल्या जाईल असे आश्वासन समाजाच्या प्रतिनिधींनी दिले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!