उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळविशेषशहर

महावितरण अभियंता व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे विद्युत ग्राहक 24 तासापासून अंधारात

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो. 9823995466

उमरखेड (दिनांक 10 जून)पावसाळा लागताच महावितरण विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आले आहे. काल पासून पावसाने हजरी लावातच महावितरण वीज वीस घंटे गायब झाल्याने विद्युत ग्राहकांना अंधारात झोपावे लागले सुदैवाने रात्री चा फायदा घेऊन चोरट्यानी चोरी केली नाही.

ना पावसाळ्यात साप, विंचू व विषारी साप चावण्याची घटना घडली नाही. पण महावितरण कंपनीचा असाच भोंगळा कारभार राहिला तर हे घटना घडली तर याचा सर्वस्व जबाबदार महावितरण विभागाला धरावे असे नागरिक म्हणत आहे.

महावितरण विभागाने पावसाळा लागण्याआधी जर का दर महिन्याला मेन्टनसं करून ट्री कटिंग, विद्युत तारा भवती कुजलेले वाळलेले झाडे तोडणे,आलेला विद्युत एम्पर व जंपर चेक करून वोअर लोड कनेकशन चे विभाजन केले असते तर आज विद्युत पुरवठा वीस घंटे खंडित होत नव्हता.आज महावितरण च्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आळशी कामामुळे वीस वीस तास विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे कंपनी ला लाखोचा चुन्ना लागत असून विद्युत ग्राहक परेशान आहे.

महावितरण विभागाचा भोंगळा कारभार बगुन सुद्धा कार्यकारी अभियंता कोणतीच कार्यवाही करताना दिसत नाही.

या विभागाचे लोकप्रतिनिधी खासदर नागेश पाटील आष्टीकर व आमदार किसनराव वानखेडे नुसती बगग्याची भूमिका करत असल्याचे संताप नागरिक व्यक्त करत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!