धम्म हा सांगण्याचा नाही तर आचरण करण्याचा विषय आहे – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)


उमरखेड :- धम्म हा सांगण्याचा नाही तर आचरण करण्याचा विषय आहे तरच खऱ्या अर्थाने धम्माचा प्रसार भारतभर होईल असे प्रतिपादन भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी हरदडा येथे आयोजित अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत प्रमुख वक्ता म्हणून बोलताना व्यक्त केले आहे.

दादासाहेब शेळके बोलतांना म्हणाले की, आता आपल्या समाजात बोलणाऱ्याची संख्या खूप वाढलेली आहे आम्ही कृतिशील केव्हा बनणार आहोत हा प्रश्न दादासाहेब यांनी यावेळी समाजा समोर मांडला आहे.
आपले सर्वांचे आयुष्य हा जातीवादी तो जातीयवादी हा मनुवादी तो मनुवादी म्हणून आपले सर्वांचं आयुष्य खर्ची होत आहे परंतु खऱ्या अर्थाने आपण पोटजात जीवत ठेवणारेच खरे जातीवादी नाही आहोत का हा प्रश्न दादासाहेब शेळके विचारपीठा वरून समाज बांधवाला विचारला आहे. यावेळी खऱ्या अर्थाने पोट जात हाच सारा भारत होण्या पाठीमागचा सर्वात मोठा अडथळा असल्याचे शेवटी दादासाहेब शेळके म्हणाले.
सकाळच्या सत्रात सुजाताबाई दवणे यांच्या हस्ते तर प्रमुख मान्यवरांचा उपस्थीतीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठविधीतज्ञ डी.एफ हरदडकर हे होते.

तर सुरुवातीला भंते पय्याबोधी व उपस्थीत भिक्षू संघाच्या यांच्या हस्ते उपस्थितांना सामूहिक त्रिशरण पंचशील प्रदान करण्यात आले. त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या धम्म परिषदेचे उद्घाटन करून आपल्या मनोगतातून, विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्मच असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके, प्रशांत वाठोरे, अरुणदादा आळणे, अनिल साळवे , सरोज देशमुख, वीरेंद्र खंदारे, गौतम कदम ,दत्तराव काळे, सरपंच सुनिल कवडे, सरपंच दैवशिला विलास पायघण,अशोक कदम, विजय कदम,कैलास कदम यासह मान्यवर धम्मपिठावर उपस्थित होते.

यावेळी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तथा महिला पोलीस पाटलांचा सत्कार करण्यात आला,

त्याचबरोबर समाजात कार्य करणारे पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, पत्रकार गौतम वाठोरे, गौतम कांबळे या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


तरी यावेळी तेलंगणा राज्यातून आलेले अनिल साळवे , रामराव गायकवाड यांनी समाजाला एकसंघ झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही,तर अरुणदादा आळणे यांनी धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्माचे विचार पेरल्या जावे व सर्व समाज एकसंघ व्हावा त्याचबरोबर किनवट येथे होणाऱ्या दोन दोन धम्म परिषदा ह्या निश्चित समाजाला दिशा देणाऱ्या नाहीत तेव्हा त्या एकसंघ व्हाव्या अशी त्यांनी आवाहन केले.

जिजाऊ बिग्रेडच्या सरोज देशमुख यांनी तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये व बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जो महिलांना हक्क आणि अधिकार मिळाला त्यामुळेच सर्व क्षेत्रांमध्ये आज महिलांनी प्रगती केल्याचे त्यांनी सुचित केले.

या भव्यदिव्य धम्म परिषदेचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता कांबळे, गौतम कांबळे व त्यांचे सर्व सहकारी तर यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कवडे व प्रदिप कांबळे यांनी केले. रात्रीला आकाश राजा व दीदी अंजली भारती यांच्या भीम गीताचा प्रबोधनाचा वैचारिक कार्यक्रम हजारोच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.

