उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशहरसामाजिक

महाराष्ट्र वायरल न्यूज: बातमीचा धडाका! उमरखेड नगरपरिषदेने घेतली दखल, तीन दिवसांपासून अंधारात असलेले प्रभाग उजळले

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड – शहरातील नागरी समस्यांना वाचा फोडण्यात नेहमीच तत्पर असलेल्या ‘महाराष्ट्र वायरल न्यूज’ च्या बातमीची उमरखेड नगरपरिषद प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मधील बंद असलेले पथदिवे अखेर सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

नेमकी अडचण काय होती? उमरखेड शहरातील प्रभाग क्रमांक ११ आणि १२ मध्ये मागील तीन दिवसांपासून पथदिवे बंद पडले होते. यामुळे संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी भयाण अंधार पसरत असे. अंधारामुळे चोरीच्या घटनांची भीती आणि ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना येण्या-जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. नगरसेवकांची आश्वासन ठरले होते हवेत! स्थानिक नागरिकांनी या समस्येबाबत संबंधित नगरसेवकांशी फोनवरून संपर्क साधला होता. त्यावेळी नगरसेवकांनी “तत्काळ तक्रार देऊन लवकरच स्ट्रीट लाईट सुरू होतील,” असे आश्वासन दिले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

‘महाराष्ट्र वायरल न्यूज’ चा दणकासामान्यांच्या समस्या सुटत नसल्याचे पाहून ‘महाराष्ट्र व्हायरल न्यूज’ चॅनेलने या विषयावर सविस्तर बातमी प्रसिद्ध केली होती. प्रशासकीय दिरंगाई आणि नागरिकांचे हाल यावर बातमीतून प्रकाश टाकण्यात आला.

सह संपादक सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर यांनी बातमी प्रसिद्धीकरताच या बातमीची दखल घेत उमरखेड नगरपरिषद प्रशासनाने चक्रे हलवली आणि आज सकाळीच तांत्रिक बिघाड दुरुस्त करून दोन्ही प्रभागांतील पथदिवे पूर्ववत सुरू केले. नागरिकांनी मानले आभारअंधाराचे साम्राज्य दूर झाल्यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ‘महाराष्ट्र व्हायरल न्यूज’ आणि नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.”प्रशासनाने केवळ बातमीची वाट न पाहता, अशा नागरी समस्यांवर स्वतःहून पुढाकार घेऊन तातडीने निराकरण करावे, जेणेकरून जनतेला त्रास होणार नाही,” अशी भावना स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

आमच्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ‘महाराष्ट्र वायरल न्यूज’ला फॉलो करा.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!