आरोग्यताज्या बातम्यापरभणीमहाराष्ट्रमानवत

मानवत गट साधन केंद्रा अंतर्गत विदयार्थ्यांची दिव्यांगत्व व दृष्टीदोष निदान तपासणी शिबीर संपन्न

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सह संपादक)

✍🏻 प्रविण घागरे ( मानवत प्रतिनिधी) मो.8308755238

मानवत (दिनांक १६ जानेवारी)मानवत येथील गट साधन केंद्रा अंतर्गत विदयार्थ्यांसाठी दिव्यांगत्व व दृष्टीदोष निदान तपासणी शिबीराचे आयोजन १५ जानेवारी रोजी करण्यात आले होते.

सदरील शिबीराचे आयोजन समग्र शिक्षा समावेशित व शिक्षण गट साधन केंद्र मानवत यांच्या वतीने दृष्टीदोष निदान तपासणी शिबिर हे मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले होते.

सदरील शिबिरा करिता एकूण विद्यार्थी ९७ विद्यार्थी उपस्थित होते.

यापैकी तिरळेपणा दृष्टीचे एकूण १२ विद्यार्थी चष्मासाठी पात्र ठरले तर २६ विद्यार्थी ड्रॉप व टॅबलेट साठी व ५९ विदयार्थ्यांची तपासण्यात आली शिबिरासाठी भेट म्हणून सहाय्यक लेखाधिकारी जि प परभणी अवचार साहेब व जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण. बि. जी. भवर मानवतचे गटशिक्षणा धिकारी मनोज चव्हाण केंद्र प्रमुख ओम मुळे यांनी भेट दिली.

तपासणी करीता आलेल्या विद्यार्थी व पालकांना अल्पोपहार देण्यात आला.

शिबिर यशस्वीतेसाठी गटशिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने विशेष शिक्षक दत्ता सहाणे, ज्ञानेश्वर जलसिंगे, बालाजी कवडे, संतोष पांचाळ, सुजाता वाघमारे, विलास राठोड, दयानंद कापसे यांनी प्रयत्न केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!