उमरखेडताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

उमरखेड पोलीस स्टेशन ने केला भीम जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान…!

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड (दिनांक २५ एप्रिल) शहरामध्ये १४ एप्रिल २०२५ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व शांततेत पार पाडल्याबद्दल उमरखेड पोलीस स्टेशन तर्फे सत्कार सन्मान समारंभ चा कार्यक्रम पोलीस ठाण्यात आयोजित केला होता.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.नितीन भुतडा (भा.ज.प जिल्हा समन्वयक) तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.आमदार विजयराव खडसे, डॉ. प्रा. अनिल काळबांडे सर, ऍड. जितेंद्र पवार, बाळूभाऊ भट्टड हे उपस्थित होते.

शहरातील प्रमुख मिरवणुक रॅली डॉ.आंबेडकर वार्ड मधून भीमजयंती उत्सव समितीचे आयोजक/अध्यक्ष प्रफुल दिवेकर आणि कार्यध्यक्ष सिध्दार्थ दिवेकर यांचा शंकर पांचाळ, ठाणेदार, नितीन भुतडा (भा.ज.प जिल्हा सम्वयक), माजी.l आमदार विजयराव खडसे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार सन्मान करण्यात आला.

तसेच यावेळी बोरबन मधून सुमेध बोधी युवा मंडळ चे अध्यक्ष रविंद्र वाठोरे आणि आकाश लोणकर तर भगतसिंह वार्ड मधून संतोष कांबळे, इंदिरा नगर मधून शामभाऊ धुळे, पाटील नगर मधून निशांत मनवर, भिमजयंती अध्यक्ष/आयोजक – यांचा ही सत्कार सन्मान करण्यात आला होता.

पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, रविंद्र वाठोरे, डॉ. प्रा. अनिल काळबांडे यांनी आपले विचार व्यक्त केले.

डॉ प्रा.अनिल काळबांडे यांनी ठाणेदार शंकर पांचाळ यांना भारतीय संविधान पुस्तक सप्रेम भेट देऊन त्यांचा ही सत्कार सन्मान यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले तर प्रास्ताविक व आभार ठाणेदार शंकर पांचाळ यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला पत्रकार प्रसेनजीत दिवेकर,शामभाऊ धुळे, प्रफुल दिवेकर सिध्दार्थ दिवेकर,प्रकाश हापसे, वीरेंद्र खंदारे, निशांत मनवर, अमोल मंडाले, रविंद्र वाठोरे,आकाश लोणकर,संतोष कांबळे यांनी उपस्थिती दर्शविली.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!