Uncategorizedउमरखेडमहाराष्ट्रराजकियविशेष

आजाद समाज पार्टीचे उमेदवार देवानंद पाईकराव यांच्या प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ

महाराष्ट्र :- उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील आजाद समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार देवानंद पाईकराव यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ त्यांचे मूळ गाव मौजे पिरंजी येथे दिनांक 6 नोव्हेंबर रोजी जल्लोषात करण्यात आले.

आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे, जिल्हा महासचिव संतोष जोगदंडे, स्टार प्रचारक विनोद बर्डे, तालुका महासचिव सचिन वाहुळे, उमरखेड शहराध्यक्ष प्रफुल दिवेकर, आशिष काळबांडे, महासचिव समाधान राऊत उपसरपंच शंकर सूळ, ग्रामपंचायत सदस्य संतोष भुवाळ, रवी पडघणे सुधाकर कदम, यांच्यासह उमरखेड महागाव मतदार संघातील शेकडो मतदार उपस्थित होते,

यावेळी उमेदवार देवानंद पाईकराव आपला जाहीरनामा जनतेसमोर मांडला यावेळी पिरंजी येथील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून गावातील विविध देवस्थानासमोर प्रचाराचे नारळ फोडण्यात आले.

मतदार संघात डोर टू डोर बाईक रॅली द्वारे प्रचार करण्यात येणार असल्याचे यावेळी उमेदवार देवानंद पाईकराव यांनी सांगितले आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!