महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पुसद येथील भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा पुर्नगठीत

पुसद

(भारत कांबळे यांची तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड)

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)

✒️बाळासाहेब ढोले (पुसद तालुका प्रतिनिधी) मो.7875157855

पुसद (दिनांक 26 डिसेंबर) दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा पुसदचे दि.२५डिसेंबर रोजी पुर्नगठीत करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन भवरे जिल्हाध्यक्ष(प),तर प्रमुख पाहुणे म्हणून रुपेश वानखडे जिल्हा सरचिटणीस,राहुल राऊत प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष,किशोर आळणे संस्कार सचिव विभाग यवतमाळ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत कांबळे यांनी केले. यावेळी रुपेश वानखडे, राहुल राऊत,किशोर आळणे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष म्हणून भारत कांबळे यांची निवड करण्यात आली ,विजय बहादूर सरचिटणीस, मिलिंद जाधव कार्यालयीन सचिव ,कोषाध्यक्ष प्रल्हाद खडसे,प्रचार व पर्यटन विभाग उपाध्यक्ष बाळु ढोले,संरक्षण विभाग उपाध्यक्ष विनोद कांबळे,

तर संघटक राहुल इंगोले,अशोक कदम, बाळकृष्ण बोराडे ,विठ्ठल कांबळे, बाबुराव सवंगडे, प्रचार व पर्यटन सचिव किसन धुळे, संरक्षण विभाग सचिव भोजराज कांबळे, संस्कार सचिव भगवान खंदारे,

प्रभाकर पाईकराव यांची निवड करण्यात आली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रल्हाद खडसे यांनी केले. तर आभार भोलानाथ कांबळे यांनी केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!