www.google.comउमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) बरखास्त करून नवीन पारदर्शक प्राधिकरण स्थापन करा!

🚨[एसआयवो विद्यार्थी संघटनेची प्रधानमंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी]

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड :- गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांतील लाखो विद्यार्थ्यांसाठी, नीट ही केवळ एक परीक्षा नाही; हे अनेक वर्षांच्या त्यागाचे, आर्थिक भाराचे, जागरणाचे आणि सन्माननीय भविष्याच्या आशेचे प्रतीक आहे. निष्पक्ष परीक्षा घेण्यात वारंवार येणाऱ्या अपयशामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र मानसिक ताण, चिंता, असुरक्षितता आणि विश्वासाची कमतरता निर्माण होत आहे.

स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एसआयओ) महाराष्ट्र ने पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर आणि झालेल्या तपासानंतर नीट-यूजी 2026 परीक्षा रद्द करण्याच्या घडामोडींचा तीव्र निषेध करत, 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया गेल्याने एनटीएच्या विश्वासहार्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करत विविध मागण्याचे निवेदन प्रधानमंत्री यांना देण्यात आले.

निवेदनात पेपरफुटी ची पारदर्शक चौकशी व दोषींना कठोर शिक्षा द्या ,परीक्षा प्रणालीचे विकेद्रीकरण करून राज्यांना अधिक अधिकर द्या ,निट युजी परीक्षा सुरक्षा व डिजीटल प्रणालीत सुधारणा करा ,निट युजी प्रकरण शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जवाबदारी स्वीकारून राजीनामा घ्यावा ,नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) बरखास्त करून नवीन पारदर्शक प्राधिकरण स्थापन करा..!

दिनांक 21 जून 2026 रोजी नियोजित असलेल्या फेर-परीक्षेसंदर्भात योग्य विद्यार्थी-स्नेही व्यवस्था आणि स्पष्ट संवाद ,बाधित विद्यार्थी आणि पालकांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन आणि कल्याणकारी सहाय्य प्रणाली, विद्यार्थ्यांच्या हितासाठी तात्काळ सुधारणात्मक उपाययोजना कराव्यात आणि राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करावा! अशा मागण्या चे निवेदन संघटने तर्फे उपविभागीय अधिकारी यांचे मार्फेत प्रधानमंत्री यांना देण्यात आले.

निवेदन देतांना निट परिक्षार्थी सोबत जिल्हाध्यक्ष मो. आवेज, रेहान समी, अब्दुर रहमान, सैय्यद अय्यान, अशर हम्माद आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!