उमरखेडउमरखेड तालुक्यातीलक्राइम गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळशैक्षणिकसामाजिक

धक्कादायक: मतिमंद विद्यार्थ्यांच्या मुखातील घास पळवला; उमरखेडच्या निवासी शाळेतील धान्य बाजारात विक्रीसाठी!

✍🏻बबलू भालेराव (मुख्य संपादक)

उमरखेड – समाजातील सर्वात दुर्लक्षित आणि विशेष गरजा असलेल्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या हक्कावर डल्ला मारण्याचा संतापजनक प्रकार उमरखेड येथे उघडकीस आला आहे. येथील श्री. शिवाजीराव मोघे निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी असलेले शासकीय धान्य मुख्याध्यापकांच्या संगनमताने चक्क बाजारात विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

∆नेमकी घटना काय?
स्व. दिगांबरराव निलपवार बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचलित या निवासी शाळेत मतिमंद विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था केली जाते. मात्र, या विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी आलेला गहू, डाळ, चणा, वाटाणा यांसारख्या धान्याचा साठा शाळेच्या आवारातून बाहेर काढून विक्रीसाठी पाठवण्यात येत होता. धक्कादायक बाब म्हणजे, हे धान्य अधिकृत काट्यावर मोजून ऑटो क्रमांक MH29 M3022 द्वारे बाजारात नेले जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

∆•मुख्याध्यापकांचे उर्मट उत्तर
या गंभीर प्रकरणाबाबत ‘महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल’ च्या मुख्य संपादकांनी मुख्याध्यापक विनोद मुटकुळे यांना मॅडम चंद्रे यांच्या मोबाईलवरून संपर्क साधून विचारणा केली. मात्र, आपली चूक मान्य करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी उर्मटपणे उत्तर दिले. “तुम्ही याकडे कशाला लक्ष देता? तुम्ही मुलांच्या ॲडमिशनसाठी आला आहात, इतर कामात दखल देऊ नका!” असे म्हणत त्यांनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. मुख्याध्यापकांच्या या उत्तरामुळे या शाळेत असे गैरप्रकार नियमितपणे सुरू असल्याची शंका बळावली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी
शहरातील ही एकमेव निवासी मतिमंद शाळा असल्याने प्रशासकीय देखरेखीचा अभाव आहे. याच संधीचा फायदा घेऊन विद्यार्थ्यांच्या वाट्याचे धान्य विकले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून: आजच्या तारखेचे शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जप्त करून तपासण्यात यावे.

∆•संबंधित ऑटो चालकाची आणि मुख्याध्यापकांची चौकशी व्हावी.
∆• दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करून मतिमंद ∆•विद्यार्थ्यांच्या हक्काचे धान्य वाचवावे.

• चौकट – “ज्या मुलांकडे कोणीही पाहत नाही, अशा मतिमंद मुलांच्या भोजनाचे धान्य विकणे हा मानवतेला काळिमा फासणारा प्रकार आहे. प्रशासनाने यावर तात्काळ दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” अशी भावना उमरखेडवासीयांकडून व्यक्त होत आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!