ताज्या बातम्यापुसदमहाराष्ट्रयवतमाळसन्मान सत्कारसामाजिक

धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026 सोहळ्याचे थाटात उद्घाटन!

🔥धम्म हा समाजाचा पाया आहे – डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर

✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

पुसद – सम्राट अशोक, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम सम्राट अशोक भगवान गौतम बुद्ध महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामूहिक त्रिशरण पंचशील, संघमित्रा महिला मंडळ व सुजाता महिला मंडळ यांच्या वतीने घेण्यात आले. [या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांचे पुष्पावंती नगरीमध्ये शासकीय विश्रामगृहाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकापर्यंत मोठ्या रथामध्ये गाजत वाजत रॅलीमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले.] समता सैनिक दलाच्या वतीने डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सलामी देण्यात आली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गुलाबी पुष्पहार अर्पण करण्यात आला,जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर हे होते तर अध्यक्ष म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीचे अध्यक्ष भीमराव दादा कांबळे हे तर धम्मक्रांती 2026 चे अध्यक्ष डॉ. सुनील खाडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“2026 या जयंती वर्षात पुसद मध्ये मी पहिल्यांदाच आलो आहे या नगरीमध्ये धम्म क्रांती प्रज्ञापर्व आयोजन
समितीच्या वतीने मला पुसदला येण्याचा पहिला सन्मान मिळाला आहे पुढे बोलताना म्हणाले की
डॉ. बाबासाहेबांनी टप्प्याटप्प्याने धम्म क्रांतीकडे वळले आणि जीवनाच्या अखेरीस बाबासाहेबांनी धम्माकडे वळून नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर पाच लाख दलितांना पवित्र बौद्ध धमाची दीक्षा देऊ नवक्रांती केली. आजही बहुजन समाजातील वंचित दलित समाज मोठ्या संख्येने बौद्ध धम्मा मध्ये येण्याचे प्रमाण लाखोंनी वाढले आहे. येणाऱ्या काळात शासनाच्या वतीने अनेक सर्वे केल्या जात आहेत आपण त्या सर्वे मध्ये धम्माच्या रखान्यामध्ये माहिती देताना बौद्ध धम्म असे लिहावे व जात असल्यास आपण ज्या जातीतून आला त्या जातीचा उल्लेख करून तो रकाना भरून पूर्ण करावा असे आवाहन धम्मक्रांती प्रज्ञापर्व2026 या सोहळ्याच्या उद्घाटकीय भाषणातून भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले”

या धम्म मंचावर प्रामुख्याने उपस्थित,भीमराव यशवंतराव आंबेडकर, भीमराव दादा कांबळे, प्रा. सुनील खाडे सर, डॉ.विठ्ठल खाडे प्राचार्य मुंबई
बुद्ध रत्न भालेराव, किशोर दादा कांबळे, मिलिंद जाधव, भोलेनाथ कांबळे,भास्कर पाढेन भारत कांबळे, प्रतिमा वाकळे, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक धम्मक्रांती प्रज्ञापर्व समिती20 26 अध्यक्ष डॉ. प्रा सुनील खाडे सर यांनी केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ल.पु. कांबळे व आभार राजेश ढोले यांनी केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!