उमरखेड दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी स्वर दीपावली या कार्यक्रमाचे आयोजन!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 18 ऑक्टोबर) गेल्या पाच वर्षापासून दीपावलीच्या शुभ पर्वावर उमरखेड शहरातील संगीत प्रेमी संजय मुटकुळे यांच्या रिदम म्युझिक अकॅडमी तर्फे सांज दीपावली या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाला उमरखेड पतंजली व ग्राहक पंचायत यांचं नेहमी सहकार्य असतं, तरी ही यावर्षी तोच कार्यक्रम “स्वर दीपावली ” या नावाने सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर, सकाळी ९ वाजता श्री सिद्धेश्वर संस्थान (टेकडी) , पुसद रोड येथे हॉलमध्ये ठेवण्यात आला आहे.

दरवर्षी या कार्यक्रमाला रसिकांची गर्दी वाढत आहे हा कार्यक्रम म्हणजे दिवाळीनिमित्त दर्दी रसिकांसाठी संगीतमय मेजवानीच आहे.

रिदम सांस्कृतिक कला मंच दरवर्षी नवनवीन कलावंतांना घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करत असतो. शहरातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात.याहिवर्षी तालुक्यातील अनेक वर्षापासून निस्वार्थ भजनसेवा करणारे ज्येष्ठ व दिव्यांग आणि अंतिम भजन सेवा मंडळ (दुःख के हम साथी) अशा 20 कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

या दिवाळीमध्ये पण अतिशय श्रवणीय असा शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतावर आधारित अभंगापासून भैरवीपर्यंत असा दर्जेदार कार्यक्रम खास रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची मुख्य गायिका पुणे येथे संगीताचे धडे घेत असलेली व संगीतकार श्री संजय म रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहे आणि सोबत बऱ्याच कलावंतांचा ताफा आहे.तरी या संगीतमय कार्यक्रमाला शहरातील रसिकांना सादर आमंत्रित करण्यात येत आहे.
