धामणगांव (वाठोडा) येथील शेतकरी अरविंद मसराम यांनी रेशीमउद्योगातून साधली प्रगती

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466
वर्धा धामणगांव (वाठोडा) (दिनांक 19 जून) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत बजाज कृषी महाविद्यालय पिपरीद्वारे राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण जागरुकता व कार्यानुभव 2025-2026 शैक्षणिक सत्राच्या विध्यार्थ्यांनी धामणगांव (वाठोडा) येथील अरविंद मसराम यांच्या रेशीम उद्योगाला भेट देऊन माहिती जाणून घेतली.

हिंगणघाट चे शेतकरी अरविंद मसराम यांनी शेतीला जोड म्हणून या रेशीम उद्योगाला चालना दिली.मागील 5-6 वर्षांपासून ते या उद्योगासोबत जुडून असून आता पर्यंत 80-90 टक्के या क्षेत्रात यश प्राप्त केले आहे.विशेष त्याचे जे शेड ची रचना बांबूनीं तयार केली आहे. ते लोकांना तिथे आकर्षित करत आहे. स्वतःहा अरविंदजी रेशीम कोष मार्केटिंग नाशिक, बंगलोर येथे करीत आहे. यांच्या या युनिट ला माजी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले साहेब सुद्धा भेट देऊन या उद्योगाची दखल घेतली आहे.

श्रमिक अरविंद मसराम गावाकऱ्यांसाठी व नवीन पिढीतील युवकांनसाठी आदर्श ठरत आहे.या रेशीम उद्योगाची माहिती जाणून घेण्याकरिता बजाज कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्राचार्य डॉ. स्नेहल देशमुख, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र खर्चे, डॉ. मंगेश घोडे, डॉ. कविता चोपडे यांच्या मार्गदर्शनात 15 जून रोजी भेट दिली.
यामध्ये प्रसाद भोयर, संकेत नाकाडे, पवन सातपैसे, तुषार मानमोडे, जीवन धारपुरे, धीरज लिचडे, महेश मुंने या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
