ताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

अनंतवाडी निंगणुर येथे आदिवासी बहुल गांव खेड्यातील नागरीकांना भीषन पाणी टंचाई..!

✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 30 एप्रिल) तालुक्यातील अनंतवाडी निंगणुर येथील आदिवासी बहुल गांव खेड्यातील नागरीकांना भीषन पाणी टंचाईचा सामना करवा लागत आहे.

तालुका दंडाधिकारी तशिलदार व गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन निंगणुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनंतवाडी येथे मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.

अनंतवाडी येथील नागरीकांना पाणी आणण्यासाठी 2 ते 3 किमी अंतरावर पायी चालत जावे लागते, त्यामुळे येथील महिला व लोकांना भयानक नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल योजनेसाठी कोट्यावधी रुपये खर्च करुन जलजिवन मिशन योजना राबवित आहे. अनंतवाडी येथे दोन वर्षापासुन जलजिवन मिशनचे काम चालु आहे पण ते अध्यापहि पुर्ण झाले नाहि यामुळे अनंतवाडी येथे पाण्याची मोठ्या प्रमाणात पिण्याची समस्या असल्यामुळे अनंतवाडी येथील लोकांना मजुरी व शेतीच्या कामे करण्याकरीता जाणे होत नाही.

अनंतवाडि येथे आदिवासी बहुल वस्ती असल्यामुळे येथील लोकांना शेतमजुरी करुन उदरनिर्वाह करावा लागतो येथे त्यांना आर्थीक परिस्थीला सामोर जावे लागत आहे.वारंवार ग्रामपंचायत मंध्ये ग्रामसभेमध्ये पाण्याच्या समस्या सरपंच व ग्रामसेवकांना अनेक वेळा सांगुन त्यांनी काहि दखल घेतली नाही.

या संदर्भात आज निवेदन देण्यात येत आहे. येत्या 6 ते 7 दिवसात अनंतवाडी येथे पाण्याची सुवीधा उपलब्ध करुन नाहि दिल्यास आपल्या कार्यालयासमोर संपुर्ण गावकरी अमरण उपोषण करील आसा ईषारा ज्ञानेश्वर वायकुळे यांनी दिले.

निवेदन देतेवेळी ज्ञानेश्वर वायकुळे, दत्ता रणमले,रंगराव वायकुळे, तुकाराम अंभोरे, एडवोकेट रवि गव्हाळे, संतोष वायकुळे इत्यादी अनेक जण उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!