अपराधताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

वाईट विचाराची होळी हीच खरी होळी…- प्रा. आर. डी. शिंदे

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

होळी रे होळी पुरणाची पोळी… असं म्हणत आपण होळी साजरी करतो व वाईट विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. पुराण काळातील कथा आपल्या सर्वांना ज्ञात आहे. वाईट विचारांची होळी का आणि कशी साजरी करावी? माणसाच्या मनात असंख्य वाईट विचार, निराशा, नकारात्मक विचार, द्वेष, लोभ, काम, क्रोध,अशा भावना जागृत असतात. भावना काही केल्याही जात नाहीत.

यासाठी काय करावं? भारतीय भारतीय संस्कृती ही जगात महान संस्कृती आहे.

या संस्कृतीने प्रत्येक सण, उत्सव यामध्ये काही अमूल्य विचार दिलेला आहे. तो आता समजून घेतला पाहिजे. वाईट विचाराची होळी करण्यासाठी संत संगतीची गरज असते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये या संदर्भात सुंदर विवेचन केलेले आहे. यातून वाचले पाहिजे. होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुलीवंदन सादर करतो.

यामागे सुद्धा खूप मोठा शुद्ध उद्देश आहे. आपण एकमेकांना रंग लावतो. तो रंग प्रेमाचा असला पाहिजे, शुद्धतेचा असला पाहिजे, विचारांचा असला पाहिजे, आचारांचा असला पाहिजे, आणि हा रंगाने एकमेकांना अतिशय प्रेमाने लावला पाहिजे. यामुळे जातीपातीच्या धर्माच्या पंथाच्या भिंतीं गळून पडतील.

जग कितीही वेगाने बदलले तरी सण उत्सव, परंपरा आणि संस्कृती कधी बदलणार नाही. आपल्या संस्कृतीचा हा ठेवा.

आपण या सण उत्सवाच्या माध्यमातून जपला पाहिजे तरच खरी होळी साजरी झाली असे म्हणता येईल. आपण पर्यावरण पूरक होळी साजरा कशी करू शकता? आपल्या परिसरातील कचरा आपण जमा केला पाहिजे. सर्वांच्या मदतीने तो विकसित करून एका जागी गोळा केला पाहिजे.

सर्वांनी एक शपथ घेतली पाहिजे की मी माझा परिसर स्वच्छ ठेवेल.

माझ्या मनातील वाईट कचरा सुद्धा या होळीमध्ये जाळेल. मी मनामधला क्रोध या ठिकाणी जाळेल. सर्व अशी शपथ घेऊया आणि अशी पर्यावरण पूरक होळी साजरी करूया…मोठयाने म्हणा… होळी रे होळी पुरणाची पोळी…

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!