उमरखेड येथे चुलीवर भाकरी करून वंचितचे प्रतीकात्मक आंदोलन
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

उमरखेड: वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये”नरेंदर कब मिलेगा सिलेंडर”हे गॅस टंचाईच्या विरोधातील राज्यव्यापी प्रतिकात्मक आंदोलन उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी के दामोधर व तालुका अध्यक्ष संबोधी गायकवाड यांच्या नेतृत्वात लाकडाच्या चुलीवर भाकरी करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

गॅसच्या तुटवड्यामुळे हजारो छोटे व्यवसायिकांनी आपले दुकाने बंद केले. राज्यातील अनेक शहरात अनेक हॉटेल्स मध्ये चहा नाश्त्याचे पदार्थ, इडली, डोसा, तळले जाणारे पदार्थाची विक्री बंद झाली आहे ,लग्न समारंभ, घरगुती कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम,केटरिंग ची कामे गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात आले आहेत अनेक शहरात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मेस मध्ये गॅस नसल्यामुळे जेवणाचे डबे बंद झाले आहेत अनेक विद्यार्थी आपल्या गावाकडे परत आली आहेत.

केंद्र सरकार व राज्य सरकार म्हणत आहे की परिस्थिती सर्वसामान्य आहे तर मग सांगा की नागरिक अजूनही गॅस सिलेंडर साठी रांगेत का उभे आहेत? आपण आपल्या एसी ऑफिस मधून बाहेर पडावे आणि बाहेरील परिस्थिती बघावी, गॅस सिलेंडर साठी लाखो लोक रांगेत उभे आहेत त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे गॅस टंचाईच्या बाबतीत कोणी आवाज उठवला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याचे जणू काही फरमानच शासनाने काढले आहे त्यामुळे वंचित बहुजन आघाडी यवतमाळ पश्चिम च्या वतीने उपविभागीय अधिकारी उमरखेड यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना खालील मागण्याचे निवेदन दिले आहे.

आमच्या मागण्या:-1)गॅस सिलेंडर साठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी
2) गॅस सिलेंडरचा काळाबाजार रोखावा
3) 25 दिवसानंतर गॅस मिळेल ही आठ शिथिल करण्यात यावी
4) काळाबाजार करणाऱ्या लोकांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
५) वस्तीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारकडून कम्युनिटी किचन सुरू करावे, सरकारकडून प्रत्येक दोन किलोमीटरवर जेवणाची व्यवस्था करून गरजू लोकांना अन्न देण्यात यावे.
6) सरकारने सांगावे की परिस्थिती कधी सामान्य होईल जेणेकरून सामान्य लोकांना ह्या परिस्थितीसाठी तयार राहता येईल
7) राज्यात अनेक ठिकाणी केवायसी नाही आहे म्हणून नागरिकांना गॅस सिलेंडर दिला जात नाही नागरिकांना तातडीने गॅस दिला जावा.
8) जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे याचे ऑडिट करावे.

यासह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष डी के दामोधर, उमरखेड तालुका अध्यक्ष संबोधी गायकवाड, तालुका महासचिव आनंदराव वाहुळे, विष्णू हापसे ,अमोल कांबळे, संतोष गायकवाड ,सारीपुत वाहुळे,राजेश घुगरे,गजानन, सचिन खंदारे, भालेराव, शंकर इंगोले, तुकाराम इंगोले, बबनराव वाहुळे, तौफिक मुस्तफा शहा, भीमराव हापसे, गणेश वाठोरे ,अरुण गडदे ,संभाजी बहादुरे ,धम्मदीप काळबांडे, गंगाधर कांबळे, माया गोवंदे, विद्या इंगोले, धुरपता दवणे, संदीप दवणे ,सुवर्णमाला सावते, राजकुमार वाहुळे ,राजू गायकवाड ,धनंजय गायकवाड, अनिकेत सावतकर, सलमान नवाब ,रोहन सावतकर ,कौस्तुभ वाठोरे इत्यादींच्या सह्याचे निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातून असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
