उमरखेडमहाराष्ट्रशहरसामाजिक

संविधानामुळे लोकशाही जिवंत आहे – प्रो डॉ अनिल काळबांडे

संविधान दिन

✍️ बबलु भालेराव (मुख्य संपादक)

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (उपसंपादक)

उमरखेड :- (दिनांक १५ डिसेंबर) भारतीय संविधानानेच या देश्यात स्वातंत्र्य समता बंधुत्व व न्याय दिल्याने सर्व सामान्य माणसाला आपले हक्क व अधिकार मिळाला तो सन्मानाने मानसा सारखे जिवन जगू लागल्यामुळे खऱ्या अर्थाने केवळ संविधानामुळेच लोकशाही जिवंत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात विचारवंत प्रोफेसर डॉ अनिल काळबांडे यांनी केले ते एम पी जे मार्फत आयोजीत बंधुता अभियानात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

अल हुद प्राथमिक शाळेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधीतज्ञ याशीन खान (पुसद ) हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास संशोधक डॉ प्रेम हनवते , इनायतउल्ला जनाब , शाहरूख पठाण , अँड अरमान अंबेजोगाईकर हे होते . डॉ प्रेम हनवते यांनी भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया सांगून संविधानाने आम्हाला काय दिले हे सांगीतले तर शाहरूख पठाण यांनी अंधारातील दीपस्तंभ हा संविधान आहे.

त्यामुळे तरुणांनी आपले हक्क कर्तव्य व जबाबदारीने संविधानाचे रक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले . डॉ काळबांडे यांनी या वेळी खंत व्यक्त केली की स्वातंत्र्याची ७५ वी जसी घर घर तिरंगा अभियान शासन प्रशासनाने चालवून स्वातंत्र्य सैनिकास अभिवादन केले.

स्वातंत्र्या चा गौरव केला तसा संविधानाच्या ७५ वी चा का केला नाही ही खंत व्यक्त केली आपल्या अध्यक्षीय भाषणात अँड यासीद खान यांनी, मानव अधिकार व त्याचे सातत्याने होणारे हनन या वर सविस्तर मार्गदर्शन करून मानव अधिकाराची आज गरज असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख रसूल पटेल तर सुत्रसंचालन फिरोज अन्सारी तर आभार साबिर नाईक यांनी मानले या वेळी मान्यवरांनी भारतीय संविधान दिवस ते प्रजासत्ताक दिवसा प्रयन्त एमपी जे च्या मार्फत चालवण्यात येत असलेल्या संविधान जनजागृती अभियानाचे कौतूक केले.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!