शिवाजी विद्यालय चातारी येथे यशवंत विद्यार्थ्यांचा सन्मान व विद्यार्थी स्नेहसंमेलन संपन्न
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सहसंपादक)

उमरखेड:- श्री शिवाजी विद्यालय चातारी येथे सन २००३-४ मध्ये ८ वर्ग पास झालेले माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्श गुरूच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून शिक्षकांचा सत्कार या स्नेहसंमेलना २०२५ दरम्यान केला. तसेच या यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा विद्यालयाकडून गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष. सुरेशराव कदम तर प्रमुख मार्गदर्शक डॉ . विजयराव माने, अँड अर्चनाताई माने, विश्वंभर वानखेडे, किशोर भारती, चिंचोलकर सर, शिवानंद बिच्चेवार,विजय लंकलवाड, प्रवीण सूर्यवंशी, मुख्याध्यापक हरी खोकले, उपस्थित होते.

चौकट :”शिवाजी विद्यालय चातारी व तेजमल गांधी विद्यालय ब्राह्मणगाव येथील शालेय विद्यार्थांना भविष्यात स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी कोडींग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या प्रयोगशाळा उभारून तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत होणार.” डॉ. विजय माने चेअरमन श्री शिवाजी माध्यमिक आणि कनिष्ठ विद्यालय.

७० वर्षापुर्वी ही शाळा ग्रामीण भागात शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी स्व. भाऊसाहेब माने यांनी स्थापन केली आणि आजही तीच भूमिका पार पाडत आहे. जेव्हा हे विद्यालय सुरू झाले, तेव्हा शिक्षण मिळवणे हेच एक मोठे आव्हान होते.

आज सर्वत्र शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे, पण तंत्रज्ञानाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेत टिकून राहणे कठीण होत आहे, जग वेगाने बदलत आहे. सध्या स्पर्धेचे जग असून विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात स्पर्धा पार पाडावी लागते.
स्पर्धेमध्ये विद्यार्थी टिकण्यासाठी कोडींग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानांमध्ये शालेय विद्यार्थांना देखील कौशल्य हस्तगत असणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे अनेक मोठ्या शहरांतील शाळा देखील अशा प्रयोगशाळा आणि प्रशिक्षण देण्यात अपयशी ठरत आहेत.

परंतु श्री शिवाजी विद्यालय आणि तेजमल गांधी विद्यालय यांच्या दूरदृष्टीमुळे, कोणत्याही मोठ्या शासकीय आर्थिक पाठबळाशिवाय, अशा स्टीम प्रयोगशाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मत डॉ. विजयराव माने यांनी आपल्या प्रमुख मागदर्शनातुन व्यक्त केले.

या प्रयोगशाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष कोडींग शिकतील, रोबोट तयार करतील, नवनवीन प्रकल्पांवर काम करतील आणि आधुनिक जगाच्या मागण्यांसाठी स्वतःला तयार करू भविष्यात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतांना या बालवयात हस्तगत केलेल्या तांत्रिक कौशल्याचा मजबूत पाया निश्चितच स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये यश संपादन करण्यास मदत होईल, यामुळे भविष्यात त्यांना मोठ्या शहरांत शिक्षण व नोकरीच्या आणि रोजगाराच्या चांगल्या संधी मिळवण्यासाठी मदत होईल.
तसेच हा बदल घडवण्यासाठी सर्वच माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याची गरज असल्याने माजी विद्यार्थी म्हणून यात योगदान देऊन आर्थिक मदत, मार्गदर्शन, किंवा शक्य असेल त्या सेवा उपलब्ध करून देण्याची व कोणत्याही स्वरूपात त्यांनी सहभाग घ्यावा व या परिवर्तनात सामील होण्याचे आव्हान डॉ. माने यांनी या वेळी केले.

या प्रसंगी ४० ते ४५ माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लाऊन यापैकी धनश्री बरडे, सारीका माने, वैजयन्ती कदम, प्रियका गांवडे, राम कदम, मनिषा सुर्यवंशी यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या कार्यक्रमाचे संचलन जीवन रणविर यांनी प्रास्ताविक राम कदम यांनी तर सर्वांचे आभार अभिजित देवसरकर यांनी मांडले.
