ताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्रसामाजिक

बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांना मिळावा व बुद्ध गया विहार कायदा 1949 रद्द करा..!

भंडारा:- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांना मिळावा व बुद्ध गया विहार कायदा 1949 रद्द करावा…!!! यासाठी महामहिम राष्ट्रपती यांना जिल्हाधिकारी कार्यालयालयामार्फत निवेदन जगातील सर्व धर्माचे धार्मिक स्थळ हे त्या त्या धर्मियांच्या ताब्यात आहेत,

मात्र बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध स्थान बौद्धांच्या ताब्यात नाही , त्यामुळे हे स्थान असुरक्षित झाले आहे ,जागतिक वारसा स्थळात याचा समावेश असून सुद्धा यावर परकीय लोकांचाच नियंत्रण आणि व्यवस्थापन आहे , त्यामुळे बौद्ध धर्माच्या नावावर येते अनेक अधार्मिक कर्मकांड होत आहेत ,

यामुळे भारतीय संस्कृतीचा अपमान होऊन भारतीय बौद्धांच्या भावना दुखावल्या जातात ,एवढेच नाही तर जगातील अनेक बौद्ध राष्ट्रे हे सुद्धा महाबोधी महाविहार यांच्या मुक्ती आंदोलनात सहभागी झाले आहेत , जागतिक स्तरावर सुध्दा याचा निषेध व्यक्त केला जात आहे.

मात्र ईव्हीएम ने निवडून येणारी सरकार याकडे जाणीव पूर्वक कानाडोळा करीत आहे , बुद्ध गया विहार कायदा 1947 हा बौद्ध धर्माच्या विरोधात आहे, त्यामुळे हा कायदा लवकरच रद्द करून बौद्ध धर्माच्या लोकांना विस्वासात घेऊन नवीन बौद्ध कायदा निर्माण करण्यात यावा , अशा मागण्या चे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे.

निवेदन देताना अण्णाभाऊ गोंडाने वंचित बहुजन आघाडी , कैलास गेडाम -असित बागडे रिपब्लिकन पार्टी , शैलेश मयुर राष्ट्रवादी गट , ऍड महेंद्र गोस्वामी बीजेपी , कुंदन शेंडे -अरविंद धारगावे बसपा , डॉ प्रवीण थुलकर काँग्रेस कमिटी , जयप्रकाश भाऊसागर प्रदेश अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम , धनपाल गडपायले जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , सुरेश खंगार एकलव्य सेना ,अभय डी रंगारी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क , संघर्ष शेंडे – मधुबाला शेंडेसामाजिक कार्यकर्ते, सुरेश वैद्य संघटक , दिघोरे , आनंद वाघमारे , गिरीधर गजभिये , महेंद्र गडकरी माजी नगराध्यक्ष भंडारा आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!